दिवाळीतील विविध मुहूर्त

प्रकाशाचे पर्व असलेल्या दिवाळीस भारता सहित संपूर्ण विश्वात मोठाल्या सणांपैकी एक सण म्हणून साजरा करण्यात येतो. विशेषतः भारतवर्षात पाच दिवसाच्या ह्या सणाला धार्मिक व सामाजिक ह्या व्यतिरिक्त आर्थिक दृष्ट्या सुद्धा खूप मोठे महत्व आहे. ह्याचे कारण म्हणजे सणासुदीच्या खरेदीमुळे बाजार सुद्धा तेजीत असते हे होय. ह्या दरम्यान विशेषतः व्यापारी वर्ग वही पूजन तर घरोघरी लक्ष्मी पूजन व पाचही दिवशी विविध पूजांचे आयोजन करण्यात येते. ह्या वर्षी दिवाळीच्या पर्वात लक्ष्मी पूजन व वही पूजनाचे मुहूर्त खालील प्रमाणे आहेत. 

धनत्रयोदशीच्या दिवशीचे धन्वंतरी पूजन व कुबेर पूजन 

२५ ऑक्टोबर २०१९, शुक्रवार 
धन्वंतरी पूजा मुहूर्त - सकाळी ०६.२८ ते ०८.४३.
धनत्रयोदशी पूजा मुहूर्त - संध्याकाळी ०७.०८ ते ०८.१५.

 

नरक चतुर्दशी पूजन 

२६ ऑक्टोबर २०१९, शनिवार 
नरक चतुर्दशी मुहूर्त - रात्री ११.४० ते १२.३१
मारुती पूजनाचा मुहूर्त - रात्री ११.४० ते १२.३१


दिवाळीच्या दिवशीचे लक्ष्मी पूजन

२७ ऑक्टोबर २०१९, रविवार 
लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त - (१) संध्याकाळी - ०६.४२ ते ०८.१४ (पंचांगानुसार)
                                  (२) रात्री - ११.३९ ते १२.३१ (पंचांगानुसार)

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाचे चौघडी प्रमाणे शुभ मुहूर्त 

   दुपार नंतरचा मुहूर्त (शुभ) - दुपारी ०१.२९ ते ०२.५३
   संध्याकाळचा मुहूर्त (शुभ, अमृत, चल) - संध्याकाळी ०५.४० ते रात्री १०.२९ 
   रात्रीचा मुहूर्त (लाभ) - रात्री ०१.४१ ते २८ ऑक्टोबरच्या पहाटेचे ०३.१७
   २८ ऑक्टोबरच्या पहाटेचे मुहूर्त (शुभ) - पहाटे ०४.५४ ते ०६.३०

वही पूजन (शारदा पूजन)

२७ ऑक्टोबर २०१९, रविवार
दिवाळीच्या दिवशीचे वही पूजनाचे शुभ मुहूर्त (चौघडी नुसार)
   दुपार नंतरचा मुहूर्त (शुभ) - दुपारी ०१.२९ ते ०२.५३ 
   संध्याकाळचा मुहूर्त (शुभ, अमृत, चल) - संध्याकाळी ०५.४० ते रात्री १०.२९
   रात्रीचा मुहूर्त (लाभ) - रात्री ०१.४१ ते २८ ऑक्टोबरच्या पहाटेचे ०३.१७
   २८ ऑक्टोबरच्या पहाटेचे मुहूर्त (शुभ) - पहाटे ०४.५४ ते ०६.३०
   अमावास्या तिथीचा आरंभ - २७ ऑक्टोबर २०१९ च्या दुपारी १२.२३ 
   अमावास्या तिथीची समाप्ती - २८ ऑक्टोबर २०१९ च्या सकाळी ०९.०८ 

गणेशजींच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम