रवी रास व चंद्र रास ह्यातील फरक


पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्या पूर्वी पासूनच तिच्यावर तारकांचा प्रभाव पडत गेला आहे. आपल्या नशिबा पासून कोणाचीही सुटका होत नसते हे सत्य स्वीकारावयासच लागते. मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर राशींचा प्रभाव होतच असतो, ज्यात विशेषतः आपले चारित्र्य, आर्थिक यश, नातेसंबंध इत्यादी. परंतु असे बघण्यात येते कि जेव्हा एखादी व्यक्ती ज्योतिष विषयावर बोलू लागते, तेव्हा चंद्र राशीच्या तुलनेत रवी रास अधिक प्रचलित असल्याने त्यास रवी राशी प्रमाणे बघण्यात येते. 

तसे पाहू गेल्यास राशीचक्र आपणास संपूर्ण माहिती देण्यास सक्षम नसते, व आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचे खोलवर विश्लेषण करण्यासाठी चंद्र रास व लग्न रास ह्यांची मदत घ्यावी लागते. येथे एक शंका उत्पन्न होते कि एकाच राशीत जन्मलेल्या विविध लोकांचे राशीफल वेग - वेगळे असू शकते का ?

रवी राशीचे महत्व काय आहे ?

आपल्या सौर मंडळात किंवा पृथ्वीवर जीवाची उत्पत्ती झाल्या पासून त्याच्या संगोपना पर्यंतचे कोणतेही कार्य सूर्याच्या उर्जे शिवाय अशक्यप्रायच आहे. त्यामुळे पृथीवर किंवा आपल्या जीवनावर सूर्याहून अधिक महत्वाची शक्ती इतर कोणतीच नाही असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही. ह्या आधारे असे सुद्धा म्हणता येईल कि रवी राशीचे महत्व आपल्या जीवनात तितकेच महत्वाचे आहे जितके आपल्या जीवनात सूर्याचे अस्तित्व. सूर्य आपल्या जीवनाच्या प्रार्थमिक गरजांचे प्रतिबिंब असल्याने आपले व्यक्तिमत्व त्यानुसार निर्माण होते. राशीचक्र व ज्योतिष हे ह्याहून पुढे जातात, परंतु जीवनावर होत असलेला चंद्र रास व लग्न रास ह्यांचा प्रभाव कोणी नाकारू शकत नाही. 

चंद्र राशीचे महत्व काय आहे ?

चंद्र रास हे आपल्या अंतरात्म्याचे प्रतिबिंब आहे. ज्यामुळे आपल्या चारित्र्याची ओळख निर्माण करून त्यातील सर्व पैलूंना हि रास प्रभावित करते. ज्यात आपल्या संवयी, भावना व व्यवहार ह्या सारख्या पैलूंचा समावेश आहे. मुख्यत्वे चंद्र आपले आंतरिक चारित्र्य दर्शविणाऱ्या लक्षणांना प्रभावित करतो, जे फक्त आपल्या निकटवर्तीयानाच माहित असते. 

चंद्र रास हि रवी राशीहून अनेक गोष्टीत वेगळी आहे. चंद्र राशीत जल, वायू, अग्नी व पृथ्वी तत्वांचा समावेश आहे. अशा राशींच्या व्यक्तींना ओळखणे अत्यंत कठीण असते, व सामान्यतः अशा व्यक्तींना आपण वेगळ्या दुष्टिकोनातूनच बघत असतो. चंद्र राशीवर आधारित आपले संपूर्ण राशीफल हे मुख्यत्वे आपले व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक संबंध व नातेसंबंधांवर आधारित असते. चंद्र आधारित रास आपणास आपली सुरक्षा, मूलभूत संवयी व भावनात्मक परिवर्तन समजण्यास मदत करते. ती आपल्या अस्तित्वास व ओळखीस आत्मीयता देण्याचे काम करते. आता आपण थोडे खोलवर जाऊन ते जाणून घेऊ. 

तत्वाधारित राशी 

वायू राशी - 
मिथुन, तूळ व कुंभ ह्या वायू तत्वाच्या राशींच्या व्यक्ती बाहेरील जगाशी सहजपणे मिसळणारे, बुद्धिमान, विश्लेषक व विचारी असतात. बदलत्या परिस्थितीत एखादे उद्दिष्ट गाठण्याचा दृष्टिकोन ह्या व्यक्ती बाळगून असतात. 
अग्नी राशी - 
मेष, सिंह व धनु ह्या अग्नी तत्वाच्या राशीच्या व्यक्ती उर्जावान व आदर्शवादी असतात. ह्या भावनाशील, गतिमान व मनमौजी असतात. ह्या राशींच्या व्यक्ती शक्तीची कामे सहजपणे व आत्मविश्वासाने करतात. 
पृथ्वी राशी -
वृषभ, कन्या व मकर ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. जीवनात होणाऱ्या बदलास ह्यांची प्रतिक्रिया स्थिर व धैर्यपूर्ण अशी असते. एखाद्या लक्ष्याचा पाठपुरावा करताना ते आपल्या स्वतःहून त्यास अधिक महत्व देतात. ह्या व्यक्ती अतिशय व्यावहारिक व विश्वासपात्र असतात.
जल राशी -
कर्क, वृश्चिक व मीन ह्या जल तत्वाच्या राशी आहेत. जीवनात होणाऱ्या बदलास ह्यांची प्रतिक्रिया अति संवेदनशील व भावनात्मक असते. ह्या राशींचा व्यक्तींची स्मरणशक्ती तीव्र असते.