वसंत पंचमी २०२१ - वसंत पंचमी मुहूर्त, पूजा विधी, सरस्वती स्तोत्र व वंदना

विद्यारंभासाठी शुभ असणारी वसंत पंचमी 

माघ शुक्ल पंचमी हि ज्ञान व बुद्धीची देवता असलेल्या माता सरस्वतीचा प्रकट दिन असून ती वसंत पंचमी ह्या नांवाने साजरी करण्यात येते. ह्या दिवशी माता सरस्वतीचे पूजन करून ह्या दिवसात उपलब्ध असलेली फुले मातेस वाहण्यात येतात. ह्या दिवशी विद्यार्थी आपल्या अध्ययन सामग्रींचे सुद्धा पूजन करतात. ज्या दिवशी पंचमी हि तिथी सूर्योदय व मध्यान्ह ह्या दरम्यान असते त्या दिवशी सरस्वती पूजनाचा मुहूर्त असतो. हा दिवस विद्यारंभासाठी शुभ असल्याने अनेक ठिकाणी ह्या दिवशी शिशुंना पहिले अक्षर शिकविण्यात येते. ह्या वर्षी म्हणजे २०२१ ला वसंत पंचमी हि १६ फेब्रुवारीस साजरी करण्यात येईल. 

वसंत पंचमी केव्हा आहे 

वसंत पंचमी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करण्यात येईल. ह्या दिवशी देशात सर्वत्र माता सरस्वतीचे पूजन होईल. 

वसंत पंचमी हा शुभ दिवस आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार वसंत पंचमीस शुभ दिवस म्हणून सुद्धा संबोधण्यात येत असल्याने कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस उत्तम मानला जातो. हा दिवस मंदिराची प्राण - प्रतिष्ठा, घराची पायाभरणी, गृह प्रवेश, वाहन खरेदी, व्यापाराची सुरवात इत्यादींसाठी शुभ असतो. ह्या दिवशी अन्नप्राशन (उष्टावन) सुद्धा करता येते. 

वसंत पंचमीची पौराणिक आख्यायिका 

अशी एक आख्यायिका आहे कि भगवान श्रीकृष्णाने देवी सरस्वती ह्यांच्यावर प्रसन्न होऊन वसंत पंचमीच्या दिवशी त्यांची आराधना करण्यात येईल असा एक वर दिला. त्या दिवसा पासून वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचे पूजन करण्याची परंपरा सुरु झाली आहे. विशेषतः विद्यार्थ्यां द्वारा सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात येते. 

एक अन्य आख्यायिकेनुसार माता सीतेच्या शोधात निघालेले भगवान श्रीराम आंध्रप्रदेश व छत्तीसगढ दरम्यान पसरलेल्या दंडकारण्यात येऊन पोचले. येथे शबरीचा आश्रम होता. भगवान श्रीराम हे येथे ह्याच दिवशी आले होते असे सांगण्यात येते. आज सुद्धा ह्या प्रदेशातील लोक वसंत पंचमीच्या दिवशी तेथे असलेल्या शिळेचे पूजन करतात. एक अशी आख्यायिका आहे कि ह्याच शिळेवर भगवान श्रीराम आसनस्थ झाले होते. येथेच शबरी मातेचे मंदिर आहे. 

सरस्वती पूजन कसे करावे 

- वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनासाठी सर्व प्रथम सरस्वती मातेची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा. 
- कलश स्थापन करून सर्व प्रथम भगवान श्रीगणेशाचे स्मरण करून पूजा करावी. 
- सरस्वती मातेच्या पूजना पूर्वी त्यांना आवाहन करून त्यांचे स्वागत करावे. व त्या नंतर त्यांना स्नान घालावे. 
- मातेस पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावे. पांढरे वस्त्र व माळा घालावी. त्या नंतर माता सरस्वतीचा पूर्ण शृंगार करावा. 
- मातेस केशर मिश्रित मिठाईचा नेवेद्य दाखवावा. 
- आपली लेखणी किंवा पुस्तकांचे सुद्धा पूजन करावे. 
- सरस्वतीच्या कोणत्याही मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 

सरस्वती वंदना 

सरस्वती पूजन करताना सरस्वती मातेची स्तुती करण्यात येते. ह्या दरम्यान सरस्वती स्तोत्राचे पठन करण्यात येते. अनेक शिक्षण संस्थेतून ह्या स्तोत्राच्या माध्यमातून माता सरस्वतीस वंदना करण्यात येते. आपण घरी राहून सुद्धा ह्या स्तोत्राच्या माध्यमातून माता सरस्वतीस वंदना करू शकता. 

या कुन्देन्दु-तुषारहार-धवला या शुभ्र-वस्त्रावृता 
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। 
या ब्रह्माच्युत शंकर-प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता 
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥ 

शुद्धां ब्रह्मविचार सारपरम- माद्यां जगद्व्यापिनीं 
वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌। 
हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌ 
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥

सरस्वती स्तोत्र 

श्वेतपद्मासना देवि श्वेतपुष्पोपशोभिता। 
श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना॥ 
श्वेताक्षी शुक्लवस्रा च श्वेतचन्दन चर्चिता। 
वरदा सिद्धगन्धर्वैर्ऋषिभिः स्तुत्यते सदा॥  
स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीम्। 
ये स्तुवन्ति त्रिकालेषु सर्वविद्दां लभन्ति ते॥ 
या देवी स्तूत्यते नित्यं ब्रह्मेन्द्रसुरकिन्नरैः। 
सा ममेवास्तु जिव्हाग्रे पद्महस्ता सरस्वती॥ 
॥इति श्रीसरस्वतीस्तोत्रं संपूर्णम्॥ 

वसंत पंचमी :२०२१

वसंत पंचमी दिनांक - १६ फेब्रुवारी 
पूजा मुहूर्त - सकाळी ०७.११ ते दुपारी १२.५४ पर्यंत 
एकूण अवधी - ०५ तास ४३ मिनिटे 
पंचमी तिथी आरंभ - १६ फेब्रुवारी २०२१ च्या पहाटे ०३.३६ 
पंचमी तिथी समाप्ती - १७ फेब्रुवारी २०२१ च्या पहाटे ०५.४६ 

श्री गणेशजींच्या कृपेसह 
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम