जन्मांकानुसार आपले २०१९ चे भविष्य कथन जाणून घ्या


जन्मांकानुसार २०१९ आपणास कसे जाईल हे जाणून घ्या 

इंग्रजी वर्ष २०१९ कसे असेल, हे जाणून घेण्यास आपण उत्सुक असाल. ह्यासाठी राशीफळ व ज्योतिषशात्राचा सुद्धा आधार घेता येतो. येथे आम्ही अंकशास्त्राच्या आधारे आपल्या जन्मांकानुसार २०१९ हे वर्ष आपणास कसे जाईल हे दर्शविण्याचा प्रयत्न करत आहोत. 

आपला जन्मांक काय आहे हे प्रथम जाणून घ्या 

जन्मांकाच्या आधारे आपले नवीन वर्ष जाणून घेण्यापूर्वी आपण आपला जन्मांक काये आहे ह्याची माहिती करून घ्यावयास हवी. जन्मांक हे १ ते ९ पर्यंतच असतात, जे आपल्या जन्म दिनांकावरून ठरत असतात. जर आपला जन्म १,२,३,४,५,६,७,८,९ ह्या पैकी एखाद्या तारखेस झाला असेल तर तो आपला जन्म दिनांक समजण्यात येतो. मात्र जर आपला जन्मदिनांक ९ हुन जास्त जसे कि ११ , ३१ इत्यादी असल्यास त्यांची बेरीज करून जन्मांक काढला जातो. जसे कि आपला जन्म एखाद्या महिन्याच्या ११ तारखेस झाला असेल तर ११ ची फोड १+१ अशी करून बेरीज करण्यात येते. ह्याची बेरीज २ येत असल्याने आपला जन्मांक २ असा असेल. जन्मांका वरून व्यक्तीचा व्यवहार, स्वभाव व गुणदोष ह्यांचे ज्ञान होते. 

तारखेनुसार आपला जन्मांक 

१,१९,२८ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा १ असतो. 
२,११,२०,२९ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा २ असतो. 
३,१२,२१,३० तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा ३ असतो. 
४,१३,२२,३१ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा ४ असतो. 
५,१४,२३ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा ५ असतो. 
६,१५,२४ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा ६ असतो. 
७,१६,२५ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा ७ असतो. 
८,१७,२६ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा ८ असतो. 
९,१८,२७ तारखेस जन्मणाऱ्या व्यक्तीचा जन्मांक हा ९ असतो. 

कसे असेल आपले २०१९ चे वर्ष 
जन्मांक १ - ह्याचे प्रतिनिधीत्व रवी करतो. त्यामुळे ह्या व्यक्ती साहसी व शिस्तप्रिय असतात. परिश्रम करण्याची तयारी असल्याने जन्मांक १ असणाऱ्यांना हे वर्ष अनुकूल असणार आहे. २०१९ साली नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कौटुंबिक, वैवाहिक व प्रणयी जीवनात अनेक संधी लाभतील. हे वर्ष प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट असल्याचा अनुभव येईल. मात्र, कौटुंबिक जीवनात काही त्रास होऊ शकतो, ज्यातून बाहेर पडण्यासाठी धैर्याने पुढे जावे लागेल. वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत प्रकृतीच्या तक्रारी उदभवू शकतात, परंतु वर्षाच्या मध्यास अनुकूल वातावरण लाभलेले असेल. इतकेच नव्हे तर पूर्वी पासून होत असलेल्या त्रासातून ह्या वर्षी मुक्तता होऊन विभिन्न क्षेत्रात अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. आपणास हृदय विकार, नेत्र विकार व रक्तदाब इत्यादींचा त्रास होऊ शकतो. आपल्यासाठी रविवार व सोमवार हे शुभ दिवस असून १,४,१०,१३,१९,२२ व २८ ह्या शुभ तारखा आहेत. आपणास पिवळा रंग शुभ असून आपले शुभ रत्न माणिक हे आहे. जन्मांक २ - ह्याचे प्रतिनिधित्व चंद्र करतो. ह्या व्यक्ती भावना प्रधान व मितभाषी असतात. ह्या व्यक्ती जरी शारीरिक दृष्टया काहीशा दुर्बल असल्या तरी मानसिक दृष्टया त्या कणखर असतात. जन्मांक २ च्या व्यक्तींसाठी हे वर्ष मध्यम फलदायी राहील. आपले नुकसान जरी होणार नसले तरी विशेष असा फायदा ही होणार नाही. नोकरीत बढतीसाठी व व्यापारात वृद्धीसाठी कठोर परिश्रम केल्यासच फायदा होऊ शकेल. मात्र, वैवाहिक जोडीदारासह वर्ष मजेत जाईल. आपण नेहमीच साशंक असता. कामात बेपर्वाई व घिसाडघाई केल्याने नुकसान होऊ शकते. प्रकृतीच्या बाबतीत स्नायू व पोटाशी संबंधित विकार होऊ शकतात. आपल्यासाठी शुभ दिवस सोमवार हा असून २,११,२० व २९ ह्या तारखा शुभ तर १६,१९,२२ व २५ ह्या तारखा मध्यम फलदायी आहेत. आपणास शुभ रंग पिस्ता व पांढरा असून शुभ रत्न मोती हे आहे. 


जन्मांक ३ - ह्याचे प्रतिनिधित्व गुरु करत असतो. जन्मांक ३ असणाऱ्यांसाठी २०१९ हे वर्ष अतिशय उत्कृष्ठ असणार आहे. ह्या वर्षी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपणास यश प्राप्ती होईल. सरकारी सेवकांना हे वर्ष अतिशय चांगले जाईल तर नोकरी - व्यवसायात भरघोस आर्थिक लाभ होऊ शकेल. मात्र, जेव्हा गुरु हा रवीच्या सानिध्यात येतो तेव्हा गुरु दुर्बल झाल्याने तेवढ्या काळा पुरते अपयश पदरी पडू शकते. आपल्यासाठी वर्षाची सुरवात व अखेर  उत्तम असेल. ह्या वर्षी आपली प्रगती होईल व मान - प्रतिष्ठेत भर पडेल. आपणास कुसंगती पासून दूर राहण्याचा व खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रकृतीच्या बाबतीत आपणास त्वचा विकार व रक्ताशी संबंधित विकार होण्याची शक्यता आहे. आपणास सोमवार व गुरुवार हे दिवस शुभ असून ३,१२,२१ ह्या तारखा शुभ व ६,१६,२५ ह्या तारखा अशुभ आहेत. आपल्यासाठी पिवळा, निळा व गुलाबी हे रंग शुभ असून पुष्कराज हे रत्न शुभ आहे. 


जन्मांक ४ - ह्याचे प्रतिनिधित्व रवी करतो. जन्मांक ४ असणाऱ्यांना ह्या वर्षी अनेक आव्हानांना व उलथा पालथींना सामोरे जावे लागेल. थोडे यश सुद्धा लाभेल. मात्र, त्रास होऊ नये म्हणून दांपत्य व प्रणयी जीवनात संयमित राहावे लागेल. आपले कुटुंबीय व मित्रांसह वर्ष मजेत घालवू शकाल. ह्या वर्षात अडचणी तर येतीलच, परंतु अखेरीस यश प्राप्ती सुद्धा होईल. ह्या वर्षी प्रवास केल्याने प्राप्तीची साधने वाढू शकतील. विदेश प्रवास सुद्धा करू शकाल. आपल्या आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपणास रक्ताची कमतरता, सर्दी - खोकला व अपघात ह्यांचा त्रास होऊ शकतो. आपल्यासाठी शुभ दिवस शनिवार, रविवार व सोमवार हे असून शुभ तारखा ४,१३,२२ व ३१ ह्या आहेत. ह्या व्यतिरिक्त शुभ रंग निळा व खाकी असून नीलम व गोमेद हि शुभ रत्ने आहेत. 


जन्मांक ५ -ह्याचे प्रतिनिधित्व बुध करतो. आपल्यासाठी २०१९ हे वर्ष प्रत्येक बाबतीत यश मिळवून देणारे आहे. ह्या व्यक्ती नेहमीच क्रियाशील असतात. काही त्रास उदभवला तरी सुद्धा आपण त्याचे निराकरण करण्यास सक्षम असता. आपल्यासाठी वर्षाचा मध्य उत्तम असून त्या दरम्यान प्रगती होत असतानाच लाभदायी संधी उपलब्ध होतील. वर्षाच्या सुरवातीस व अखेरीस प्रकृतीस त्रास होऊ शकतो. वैवाहिक जोडीदारासह वर्ष मजेत घालवू शकाल. नोकरी करणार्यांना चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यापार करणार्यांना सुद्धा लाभ होतील. मात्र, भागीदारीत सावध राहण्याचा व वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. वर्षाच्या सुरवातीस आपणास सर्दी - खोकला ह्याच बरोबर हृदय विकारांचा त्रास सुद्धा होऊ शकतो. आपल्यासाठी शुभ दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार हे असून शुभ तारखा ५,१४ व २३ ह्या आहेत. आपल्यासाठी शुभ रंग हलकासा हिरवा, पांढरा व भुरकट असून शुभ रत्न पाचू आहे. 


जन्मांक ६ - ह्याचे प्रतिनिधित्व शुक्र करतो, जो कामेच्छांवर नियंत्रण ठेवतो. हे वर्ष आपणासाठी आव्हानात्मक आहे. मात्र, उत्तम मनोबल, आत्मबल व सार्थक प्रयत्न करून आपण यश प्राप्ती करू शकाल. प्रेमीजनांसाठी हे वर्ष उत्तम असून जर गैरसमजांपासून दूर राहिलात तर एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटू शकाल. आपण मुक्त हस्ते खर्च करता व सुख - संपत्तीच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील असता. आपल्यासाठी वर्षाची सुरवात त्रासदायी असेल, मात्र वर्षाचा मध्य हा सक्रियतेने परिपूर्ण असेल. कौटुंबिक स्थिती उत्तम असून सर्व चिंता दूर होतील. लंग्स इन्फेकशन, गुप्त रोग इत्यादी विकार ह्या वर्षी आपणास होऊ शकतात. अशावेळी नशापाणी पासून दूर राहण्याची व आहाराकडे लक्ष देण्याची आपणास आवश्यकता भासेल. नशापाणी केल्यास मोठे नुकसान संभवते. आपल्यासाठी शुभ दिवस बुधवार व शुक्रवार हे असून शुभ तारखा ६,१५ व २४ ह्या आहेत, तर ३,९,१२,१८,२१,२७ व ३० ह्या तारखा मध्यम फलदायी आहेत. आपल्यासाठी शुभ रंग निळा, हलका गुलाबी, क्रीम व पांढरा असून शुभ रत्न हिरा हा आहे. 


जन्मांक ७ - ह्याचे प्रतिनिधित्व वरूण करत असून ह्या व्यक्तींचा स्वभाव सौम्य, सरळ व संतोषी असतो. ह्या वर्षी आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त आहे. आपला धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोन सुद्धा उत्तम राहील व सामाजिक जीवनात आपला प्रभाव जाणवेल. नोकरी - व्यवसायात आव्हानांचा सामना करावा लागेल. कौटुंबिक जीवनात सुद्धा चढ - उतार येतील. आपण भाग्याशाली आहात, परंतु वर्षाच्या सुरवातीस व मध्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भीती, चिंता व तणावाचे वातावरण राहील व मान - प्रतिष्ठेस सुद्धा तडा जाऊ शकतो. आपण नेहमी कल्पना विलासात रमता. आपली प्रकृती चांगली राहावी म्हणून भोग विलासांपासून आपणास दूर राहावे लागेल. आपणास रक्ताशी संबधित विकारां व्यतिरिक्त कफ व खोकल्याचा त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्यासाठी ७,१६ व २५ ह्या तारखा शुभ असून १,१०,१९ व २८ ह्या मध्यम फलदायी असतात. आपल्यासाठी पांढरा व निळा रंग शुभ असतो. 


जन्मांक ८ -२०१९ हे वर्ष आपल्यासाठी सामान्यच असेल. त्रास तर होतीलच, परंतु शनिदेवांची आपल्यावर कृपा सुद्धा होईल. ह्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक उलाढाली होत असतात. ह्यांचा चेहरा बघून ह्यांच्या बद्धलचा अंदाज बांधता येत नाही. ठोस कार्यप्रणालीमुळे त्यांच्यावर टीका सुद्धा होत असते. ह्यांचा विश्वास गंभीरतापुर्वक जीवन जगण्यावर असतो. वर्षाच्या सुरवातीस व अखेरीस उत्साह व क्रियाशीलता वाढीस लागेल, मात्र वर्षाच्या मध्यास काहीशी उदासीनता जाणवेल. कामात व्यस्त राहाल, त्याच बरोबर घर किंवा नोकरीत परिवर्तन घडेल. कामा बरोबरच व्यक्तिगत आयुष्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष अनुकूल नाही. आपणास श्वसन व लघवीशी संबंधित विकार होण्या व्यतिरिक्त कंबरदुखी व इएनटी संबंधित विकार सुद्धा होऊ शकतात. आपल्यासाठी शनिवार हा शुभ असून ८,१७ व २६ ह्या तारखा शुभ आहेत. रंगात निळा, भुरकट व वांगी रंग शुभ असून नीलम हे रत्न शुभ आहे. 


जन्मांक ९ - ह्या जन्मांकाचे प्रतिनिधित्व मंगळ करतो, जो सर्वात एक तेजस्वी ग्रह आहे. २०१९ हे वर्ष आपल्यासाठी प्रगतिकारक असे आहे. आपल्यातील ऊर्जाशक्ती द्वारा आपली स्वप्ने आपण साकार तर करालच शिवाय इतरांना सुद्धा मदतरूप व्हाल. ह्या व्यक्ती कोणाच्या दबावाखाली येत नसतात. त्यामुळे ह्यांच्या शत्रूंची संख्या जास्त असते. ह्या वर्षी नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. ह्या वर्षात आपले वैवाहिक जीवन सुखद राहील, मात्र प्रणयी जीवनात काही समस्या उदभवू शकतील. वर्षाची सुरवात व अखेर उत्तम राहील, तर मध्य काहीसा प्रतिकूल राहील. सामाजिक प्रतिष्ठा व नोकरीत बढती सुद्धा होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून एखादी दुखापत होऊ शकते. रक्त व हृदयाशी संबंधित त्रास सुद्धा होऊ शकतात. आपल्यासाठी मंगळवार व शुक्रवार तसेच ९,१८ व २७ ह्या तारखा शुभ असून ३,६,१५,२१,२४ व ३० ह्या तारखा मध्यम फलदायी आहेत. शुभ रंग लाल असून शुभ रत्न पोवळे हे आहे. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी