अक्षय्य तृतीया २०१९: अक्षय्य तृतीयेचे उपाय, मुहूर्त व तिथी ह्या संबंधी

असेही वैशाख महिन्यास खूप महत्व असते. ह्या महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हि अत्यंत शुभ फलदायी व सौभाग्यशाली असल्याचे समजण्यात येते. ह्या तिथीस अक्षय्य तृतीया असे म्हणतात. साडे तीन मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त समजला जातो. ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करता येते. ह्या वर्षी म्हणजे २०१९ साली मंगळवार दि. ७ मे रोजी देशभर अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. मुख्य म्हणजे ह्या दिवशी साधारण एका दशका नंतर चार ग्रहांचा एक विशिष्ट असा योग होत    आहे, जो आपल्यासाठी फायदेशीर सुद्धा ठरू शकतो. 

आपल्या कुंडलीनुसार ग्रहांच्या प्रभावा विषयी जाणून घेऊन त्यास अधिक प्रबळ बनविण्यासाठी आपण आमच्या ज्योतिषांचा संपर्क साधू शकता. 

अक्षय्य तृतीयेशी संबंधित मान्यता 
अक्षय्य तृतीयेशी अनेक मान्यता जोडल्या गेल्या आहेत. ह्यास भगवान श्री परशुराम जयंतीच्या रूपात सुद्धा साजरी करण्यात येते. इतकेच नव्हे तर ह्या दिवशी भगवान श्रीविष्णू ह्यांचा सहावा अवतार परशुराम ह्यांच्या व्यतिरिक्त भगवान श्रीविष्णूंनी नर व नारायण हा अवतार सुद्धा ह्याच दिवशी धारण केला असल्याचे समजण्यात येते. इतकेच नव्हे तर त्रेता युगाचा आरंभ सुद्धा ह्याच दिवसा पासून झाला असल्याचे समजण्यात येते. एक अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी उपवास करून दान धर्म केल्याने अनंत फलप्राप्ती होते. ह्या उपवासाचे फळ कधी कमीही होत नाही तसेच नष्टही होत नाही, म्हणूनच त्यास अक्षय्य (कधीही नष्ट न होणारी) तृतीया म्हटली जाते. ह्या दिवशी केलेली कर्मे हि अक्षय्यच होतात. ह्या दिवशी शुभ कर्मेच करावीत. 

अक्षय्य तृतीयेस होत असलेला ग्रहांचा विशेष योग 
ह्या वर्षी म्हणजे २०१९ साली अक्षय्य तृतीयेस एक विशेष योग होत आहे. असे संपूर्ण एका दशका नंतर होत आहे. ह्या पूर्वी २००३ साली ५ ग्रहांनी असा योग घडवला होता व आता २०१९ साली पुन्हा एकदा असा योग होत आहे, ज्यात रवी, चंद्र, शुक्र व राहू आपल्या उच्च राशीतून भ्रमण करत आहेत. एकंदरीत पाहता ह्याचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव होईल. मात्र, आपल्या कुंडलीनुसार ग्रहांचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो. 

आपल्या कुंडलीनुसार ग्रहांच्या प्रभावा विषयी जाणून घेऊन त्यास अधिक प्रबळ बनविण्यासाठी आपण आमच्या ज्योतिषांचा संपर्क साधू शकता. 

अक्षय्य तृतीयेचे उपाय 
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धन प्राप्ती इत्यादीसाठी लोक विविध उपाय करत असतात. आम्ही येथे काही उपाय सुचवीत आहोत. 
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने - चांदीच्या वस्तूंची खरेदी करावी. आपणास सुद्धा प्रगती साधावयाची असते. ह्या दिवशी सोने किंवा चांदीची लक्ष्मीची चरण पादुका आणून घरात ठेवावी व त्याचे नित्य नेमाने पूजन करावे. 
- अक्षय्य तृतीयेस ११ कवड्या लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास लक्ष्मी देवी आकर्षित होते. लक्ष्मी देवी प्रमाणेच कवडी सुद्धा समुद्रा पासून उत्पन्न झाली आहे. 
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केशर व हळदीने लक्ष्मी देवीचे पूजन केल्याने आर्थिक त्रास दूर होतात. 
- अक्षय्य तृतीयेस घरी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळ स्थापन केल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. 
- ह्या दिवशी पितरांची प्रसन्नता व कृपा प्राप्तीसाठी जल कलश, पंखा, खडावा, छत्री, सत्तू, काकडी, खरबूज, फळ, साखर, तूप इत्यादी ब्राह्मणास दान करावे. 
- ह्या दिवशी गाय, भूमी, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य,गूळ, चांदी, मीठ, मध व कन्या ह्या बारांच्या दानास महत्व आहे. 
- सेवकास केलेले दान एक चतुर्थांश फल देतो. 
- कन्यादान हे ह्या सर्वात महत्वाचे असल्याने ह्या दिवशी लोक विवाहाचे विशेष आयोजन करतात. 

अक्षय्य तृतीया पर्व तिथी व मुहूर्त २०१९ 
मंगळवार ७ मे 
अक्षय्य तृतीय पूजा मुहूर्त - ०६. ४० ते १२. २६ 
अवधी - ६ तास 
तृतीया तिथीचा प्रारंभ - ०७ मे २०१९ ह्या दिवशी ००. ४७. 
सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त 
७ मे मंगळवार ह्या दिवशी ०६. २६ ते २३. ४७. 

श्रीगणेशजींच्या आशीर्वादांसह 
गणेशास्पीक्स डॉट कॉम / मराठी