नशीब काय असते ? नशीब बदलता येते का ?


मानवी संस्कृतीच्या सुरवाती पासूनच मनुष्य आपले भविष्य व आगामी काळा संबंधी माहिती करून घेण्यास उत्सुक राहिला आहे. सदैव आम्हाला हे जाणून घ्यावयाचे असते कि आपल्या भाग्यात किंवा नशिबात काय आहे ? आम्ही यशस्वी होऊ कि अयशस्वी व दुःखातच राहू ? आम्ही आमचे नशीब किंवा भाग्य कसे बदलू शकू ? आम्ही आमच्या नशिबास अनुकूल होण्यास प्रेरित करू शकतो का ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यापूर्वी आम्ही नशीब किंवा भाग्य म्हणजे काय असते ह्याची माहिती करून घेतली आहे का ? ते कशा प्रकारे कार्य करते ? बहुतेक अधिकतर लोकांचे ह्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असेच असेल. ह्याचे कारण म्हणजे आमच्या नशिबात काय आहे हे जाणून घेण्यात किंवा त्याला दोष देण्यातच आम्हाला स्वारस्य असते, परंतु आम्ही येथे आपणास खात्री देती कि जेव्हा आपण ह्या लेखाची शेवटची ओळ वाचत असाल तेव्हा आपण नशीब, त्याची कार्यपद्धती व त्यास प्रभावित करण्याची विधी ह्या विषयी आवश्यक ज्ञान प्राप्त केलेलेच असेल. तेव्हा आता सुरवात करू ..... 

आपल्या नशिबाशी कसे जोडले गेले आहे ब्रह्माण्ड 

नशीब किंवा भाग्याचा सरळ संबंध ब्रह्माण्डाशी येत असल्याने सर्व प्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे कि ब्रह्माण्ड काय आहे ? परंतु संपूर्ण ब्रह्माण्डास समजून घेणे अवघड असल्याने ज्याचा संबंध निव्वळ आपल्याशी किंवा आपल्या भाग्याशीच येतो त्यास समजून घेण्याचा आपण येथे प्रयत्न करू. मनुष्याने आपल्या ज्ञाना द्वारे ब्रह्माण्डात १२ राशी, २७ नक्षत्र व ९ ग्रहांची ओळख करून घेतली. ब्रह्माण्ड ३६० अंशाचे मानले गेले असल्याने एक रास हि ३० अंशाची तर प्रत्येक नक्षत्र १३ अंश व २० कलेचे असल्याचे मानण्यात येते. ह्या सर्व राशीत व नक्षत्रातच आपले सौरमंडळ, त्यात येणारे सर्व ९ ग्रह, रवी व चंद्र भ्रमण करत असतात. ह्या सर्व राशी व नक्षत्र सुद्धा आपल्या भोवताली सतत फिरत असतात. 

नशीब किंवा भाग्य काय आहे ?

नशीब किंवा भाग्य हे काय असते ह्याचे ज्ञान आमच्या पूर्वजांना प्राचीनकाळा पासूनच  होते. त्यामुळेच ते सांगत कि मनुष्याच्या जन्मा बरोबरच त्याचे भाग्य (नशीब) लिहिले जाते. अनेक वर्षांपूर्वी सांगितलेली हि गोष्ट आजवर व अनंत काळा पर्यंत ह्याची प्रचिती देतच राहील. कारण ह्या मागे ज्याचा संबंध आहे ते ब्रह्माण्ड गतिमान असून प्रत्येक क्षणी त्याची स्थिती बदलत असते हे होय. जेव्हा आपला किंवा कोणत्याही मनुष्याचा जन्म होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्माण्ड व त्यात असलेल्या १२ राशी, २७ नक्षत्र व सौरमंडळ आपल्या जागेवर स्थिरावले जाते. ह्याचा अर्थ असा नाही कि एखाद्या व्यक्तीच्या जन्मा बरोबर ब्रह्माण्डाची गतिशीलता थांबते, परंतु ह्याचा अर्थ असा आहे कि ज्या क्षणी नवजात शिशु आपल्या मातेच्या गर्भातून बाहेर पडून जन्म घेत असतो त्याच क्षणी असलेली ब्रह्माण्डाची, राशींची, नक्षत्रांची व ग्रहांची जी स्थिती असते ती स्थिती त्याचे नशीब किंवा भाग्य असते. वैदिक ज्योतिष शास्त्रात ह्या स्थितीला जन्म लग्न किंवा जन्म कुंडली असे संबोधण्यात येते. आम्ही ह्यास सामान्य भाषेत आपल्या ज्ञानाच्या अभावामुळे भाग्य किंवा नशीब असे समजत असतो. 

आपली जन्म कुंडली फुकटात बनवून घेऊन आपले नशीब समजून घ्या ..... 

आता आपल्या जन्म समयी लिहिण्यात आलेले आपले भाग्य किंवा नशीब (जन्म लग्न) ह्यास ब्रह्माण्डातील राशी, नक्षत्र व ग्रहांची स्थिती प्रभावित करते. हि स्थिती आपल्या नशिबात स्थायी प्रमाणात शरीर, धन - कुटुंब, पराक्रम, सौख्य, संतती - विद्या, शत्रू, वैवाहिक जोडीदार व मृत्यू पर्यंतच्या सर्व गोष्टींना प्रभावित करण्याची क्षमता बाळगून असते. 

नशीब किंवा भाग्य बदलता येते का ..... 

आता आम्हास जेव्हा हे समजले कि भाग्य किंवा नशीब म्हणजे काय असते तेव्हा हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. कारण आपले भाग्य तर आपल्या जन्म वेळे बरोबरच जोडले गेले आहे व आपण किंवा ह्या जगातील कोणतीही व्यक्ती त्या वेळेत बदल घडवू शकत नाही, मग आपण आपले नशीब किंवा भाग्य सुद्धा बदलू शकत नाही. परंतु, आपण आपल्या नशिबात दडलेले गुपित नक्कीच जाणून घेऊ शकता. आपण हे समजून घेऊ शकता कि आपणास कोणता कालखंड अनुकूल आहे व केव्हा आपणास सावध राहण्याची गरज आहे. 
आपल्या भाग्यात किंवा नशिबात काय आहे हे माहित करून घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा

आमच्या अनुभवी ज्योतिषांच्या मदतीने आपण आपली नोकरी, व्यापार, कुटुंब, प्रेम, विवाह, शत्रू, पत्नी किंवा आरोग्य ह्यांच्याशी संबंधित माहिती प्राप्त करून घेऊ शकता. 

भाग्य किंवा नशिबास प्रभावित करता येते का ?

जेथे भाग्यास प्रभावित करण्याची गोष्ट आहे तेथे वैदिक ज्योतिष शास्त्रात काही उपायांचा उल्लेख केला गेला आहे. मात्र येथे हे सांगणे गरजेचे आहे कि आम्ही आपल्या भाग्याशी संबंधित अनुकूल - प्रतिकूल परिस्थितीस प्रभावित करू शकतो व त्यामुळे आपण आपल्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता व कालखंड कमी करू शकता तर अनुकूल परिणामांची तीव्रता व कालखंडात वाढ करू शकता. असे अनेक उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहेत. ह्या उपायांचा लाभ विद्वान व ज्ञानी लोक प्राचीन काळा पासून घेत आले आहेत. ह्या उपायात उर्जित केलेली रत्ने, वैदिक यंत्रे, रुद्राक्ष, वैदिक उपायांचे साहित्य इत्यादींच्या वापराने आपण सुद्धा आपल्या भाग्यातील प्रतिकूल परिणामांना नियंत्रित करू शकता. 


हे उपाय करण्यापूर्वी आपणास अनुभवी ज्योतिषांच्या सल्ल्याची आवश्यकता असून आपल्या समस्या समजावून घेऊन पुढे जावे लागेल. आपल्या कुंडलीचा अभ्यास करून आपणास सामोरे जावे लागणाऱ्या समस्यां बद्धल सतर्क करून त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी मार्गदर्शन मिळवावे लागेल. 


वेब डेस्क 
ऍस्ट्रो लोकमत डॉट कॉम