१६ डिसेंबरला ग्रहांचा होत असलेला हा महासंयोग ! जाणून घ्या ह्याचा प्रभाव व समाधान !


डिसेंबर महिन्यातील बुध, चंद्र, रवी, गुरु, केतू व शनी ह्यांचा महासंयोग, प्रभाव व समाधान 

आपले दैनिक जीवन व ब्रह्माण्डातील ग्रह ह्यांच्यात एक अतूट नाते आहे. ह्या संबंधांचा आपल्या जन्मापासूनच आपल्यावर प्रभाव होत असतो. कधी आपल्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव होत असतो तर कधी नकारात्मक. कधी कधी ह्याचा प्रभाव मिश्रफलदायी सुद्धा होत असतो. परंतु कधी कधी ह्या अनंत ब्रह्माण्डात विहार करत असलेले हे ग्रह एक अशा स्थितीत येत असतात कि ज्यावेळी सर्व ग्रह गोचरीने कुंडलीतील एकाच भावात किंवा एकाच स्थितीत येतात. अर्थात अशी परिस्थिती अनेक वर्षां नंतर निर्माण होत असते. परंतु अशा परिस्थितीत ग्रहांचा शुभाशुभ प्रभावाचे विश्लेषण व त्यातून प्राप्त होणाऱ्या फलांचा निसर्गावर मोठा प्रभाव होताना दिसून येतो.  ग्रहांची अशीच एक स्थिती आगामी काळात पाहण्यास मिळणार आहे. दि. २६/१२/२०१९ रोजी ग्रहांचा असा एक संयोग होत आहे. ह्या दिवशी ६ ग्रह एकाच वेळी एका ठिकाणी एकत्र होत आहेत. ग्रहांच्या अशा योगास ज्योतिषीय भाषेत प्रवज्या योग किंवा संन्यास योग असे नांव देण्यात आले आहे. ग्रहांच्या अशा विरळ योगाने निर्माण होणाऱ्या सामूहिक ऊर्जेचा प्रभाव हा सामान्यपणे होणाऱ्या प्रभावापेक्षा अधिक बलवान असतो. ह्या सामूहिक ऊर्जेचा प्रभाव विश्वातील प्रत्येक प्राणिमात्रास अधिक तीव्रतेने प्रभावित करतो. 

ग्रहांच्या विशेष सामूहिक योगाची कुंडली 
दि. २६/१२/२०१९ महासंयोगची कुंडली 
दि. १६/१२/२०१९ ते दि. १६/०१/२०२०. 
दि. २६/१२/२०१९ 
वेळ :- सूर्योदय. 


उपरोक्त कुंडली हि दि. २६/१२/२०१९ ची आहे. ह्या दिवशी जो योग निर्माण होत आहे त्याचे गुणत्व व फलत्व काढण्यासाठी देशातील प्रख्यात ज्योतिषी श्री. धर्मेश जोशी ह्यांनी हि कुंडली तयार केली. ह्यात आपण बघू शकतो कि एकाचवेळी एकाच स्थानात ६ ग्रह स्थित आहेत. ह्याच योगास प्रवज्या किंवा संन्यास योग ह्या नांवाने ओळखण्यात येते. ह्या योगाने निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या प्रभावाचा अंदाज घेणे अत्यंत कठीण प्रक्रिया आहे. कारण ब्रह्माण्डातील प्रत्येक ग्रहाची आपली स्वतःची ऊर्जा, प्रभाव व तत्व असते. जेव्हा हे ग्रह आपल्या विरुद्ध प्रकृतीच्या किंवा स्वभावाच्या किंवा तत्वाच्या ग्रहांसोबत येतात तेव्हा हा योग समजून त्याचे उचित - अनुचित अनुमान काढणे कोणत्याही सामान्य गणनाकाराच्या कक्षे बाहेर होत असते. ह्या शुभाशुभ ग्रहांच्या योगास समजून त्याचे सकारात्मक - नकारात्मक प्रभाव व उपाय ह्यांना सामान्य व्यक्ती पर्यंत पोचविण्यासाठी आमच्या वरिष्ठ ज्योतिषांनी खूप परिश्रम केले आहेत. 


केव्हा व काय होणार आहे ? 

दि. १६/१२/२०१९ ते दि. १६/०१/२०२० पर्यंतच्या दिवसांचे ग्रहमान व दशा बघता हे दिवस अत्यंत जोखमीचे असल्याचे दिसत आहे. ह्या दरम्यान सर्व ग्रह हळू हळू एकाच भावात एकत्रित होणार आहेत. दि. १६/१२/२०१९ पासून एका भावात एकत्र येण्याची हि प्रक्रिया दि. २६/१२/२०१९ पर्यंत पूर्ण झालेली असेल. ह्या महासंयोगानंतर ग्रह पुन्हा एक एक करून आपल्या मार्गक्रमणाने हि युती मोडीत काढतील. ग्रहांची हि युती मोडीत निघाल्यावर त्यांचे सामान्य प्रभाव उरतील व ह्या महासंयोगाच्या प्रतिकूल परिणामांची सांगता होईल. 
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह १ किंवा २ भावांचे प्रतिनिधित्व करत असतो. जेव्हा एखादा ग्रह गोचरीने कोणत्याही भावातून भ्रमण करतो तेव्हा तो आपल्या बरोबर त्या भावात आपले तत्व व स्वभाव सुद्धा घेऊन येतो. जेव्हा ग्रह उपरोक्त कुंडलीत दर्शविलेल्या स्थितीत असतात तेव्हा जीवनात एकाग्रता व नवीन समीकरण निर्माण करत असतात. परंतु अशा स्थितीत हे महत्वाचे ठरते कि ह्या ग्रहांचा महासंयोग आपल्या कुंडलीतील कोणत्या भावातून होत आहे ते. कारण ग्रह व भावानुसारच  ज्योतिष फल वर्णविता येते. उपरोक्त कुंडलीचा अभ्यास करता असे दिसून येते कि दि. २६/१२/२०१९ रोजी होत असलेल्या ह्या महासंयोगामुळे ७ नकारात्मक योगांची निर्मिती होत आहे. 

१. (शनी - केतू) शापित योग 
२. (गुरु - केतू) विप्र चांडाळ योग 
३. (रवी - केतू) ग्रहण दोष 
४. (चंद्र - केतू) ग्रहण दोष 
५. (रवी - शनी) संघर्ष योग
६. (चंद्र - शनी) विष योग 
७. कालसर्प योग 

हि महायुती प्रस्थापित होताना प्रथम चरणात ग्रह एकत्रित होण्यासाठी आपल्या स्वतःच्या कक्षेत भ्रमण करत एका विशिष्ट कक्षेत मार्गक्रमण करतात. तसेच हे ग्रह कुंडलीतील एखाद्या स्थानात एकत्रित येऊ लागल्या पासून वेगळे होण्या पर्यंत प्रभावित होणाऱ्या ७ नकारात्मक संयोगाचे सामान्य जनमानसावर काय परिणाम होतील ? ह्या दरम्यान आपणास काय काळजी घ्यावयास हवी ?

शापित दोष - शनी - केतू मुळे निर्माण होणाऱ्या ह्या दोषामुळे आपल्या प्रगतीची शक्यता कमी होऊन सतत नैराश्य येत असते. जेथे शनी जीवनातील सर्व शक्यता व घटना सीमित करत असतो तेथे केतू प्रतिबंध व अवरोध ह्यांचे प्रतिनिधित्व करत असतो. कुंडलीतील कोणत्याही स्थानी ह्या दोन ग्रहात निर्माण झालेला योग जीवनासाठी निराशाजनकच असतो.   

विप्र चांडाळ योग - तसे पाहू गेल्यास कुंडलीत गुरूचा प्रभाव हा अमृता समान असतो. परंतु गुरु व केतू पासून निर्माण होणारा हा दोष संपूर्ण कुंडलीस नकारात्मक फले देण्यास प्रेरित करतो. ह्या दोषामुळे जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.  

ग्रहण दोष (रवी - केतू) - ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा दोन परस्पर विरोधी विचारसरणीचे ग्रह एकत्र येतात तेव्हा त्याचा प्रभाव जातकाच्या संपूर्ण कुंडलीवर होत असतो. रवी व केतू हे पूर्ण विरुद्ध विचारसरणी असलेले ग्रह आहेत. रवीची सकारात्मक ऊर्जा केतूच्या प्रतिबंधित प्रभावामुळे अवरोधली जाते. ह्या नकारात्मक युतीमुळे जीवनातील सामान्य प्रगतीस खीळ बसते. आपल्या क्षमतेनुसार व्यक्ती आपली कामगिरी करू शकत नाही. प्रतिभा असूनही पुढे जाण्याची संधी मिळत नाही.   तसे पाहू गेल्यास हा दोष अत्यंत प्रतिकूल व दुःखदायी परिस्थिती निर्माण करत असतो. परंतु ह्या दोष निवारणाचा अत्यंत सरळ व सोपा मार्ग आहे, सूर्य - केतू ग्रहण दोष निवारण यंत्र. आपण हे यंत्र कोणत्याही ज्योतिष सामग्रीच्या दुकानातून किंवा घर बसल्या ह्या लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता. 

ग्रहण दोष (चंद्र - केतू) - आपल्या मनाचे प्रतिबिंब असणारा चंद्र हा जर हिसंक व विनाशकारी केतू ग्रहाच्या सानिध्यात आला तर व्यक्ती नकारात्मक विचार करणारी होते. फलस्वरूप त्याची मानसिक शांतता भंग पावते. 

संघर्ष दोष - हा दोष रवी व शनीच्या संयोगाने होत असतो. जेथे रवी हा आपल्या जीवनातील यश व प्रसिद्धीचा कारक आहे तेथे रवीचा विरोधक शनी जीवनात विलंब व अडचणी निर्माण करत असतो. जेव्हा हे दोन विरुद्ध स्वभावाचे ग्रह कुंडलीत एकत्र असतात तेव्हा व्यक्तीला पदोपदी आव्हाने व संघर्षास सामोरे जावे लागते. 

विष दोष - हा दोष चंद्र व शनीच्या संयोगाने निर्माण होतो. चंद्र तीव्र गतिमान असलेला ग्रह असून प्राणीमात्राच्या मनाचा व मानसिक अवस्थेचा कारक आहे. ह्या उलट शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह असून पीडा व अडचणी दर्शक ग्रह आहे. ह्या दोषामुळे स्मृती क्षमतेचा ऱ्हास होण्या बरोबरच मानसिक शांततेचा भंग होतो. ह्या दोषाचा प्रभाव जीवनातील विभिन्न क्षेत्रात दुष्परिणामाच्या रूपात होताना दिसून येतो. 

कालसर्प दोष - ह्या दोषाचा प्रभाव जीवनातील यशाला प्रभावित करून समृद्धीस बाधित करतो. ह्या दोषामुळे जीवनात अचानक प्रतिकूल चढ - उतार, दुःख, अपमान, संघर्ष व इतर अन्य समस्या निर्माण होतात. ह्या दोषाचे दुष्प्रभाव जितके तीव्र असतात तितकेच त्याचे निवारण सुद्धा सोपे असते. कालसर्प दोष निवारण यंत्र ! हे ह्या दोषाचे संपूर्णपणे निवारण करण्यास सक्षम असते. आपण हे यंत्र कोणत्याही ज्योतिष सामग्रीच्या दुकानातून किंवा घर बसल्या ह्या लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता.  

डिसेंबर अखेर पासून ते जानेवारीच्या सुरवाती पर्यंत राहणाऱ्या ग्रहांच्या ह्या नकारात्मक संयोगामुळे निर्माण होणाऱ्या दोषांचे आकलन आपले योग, दशा व देशमान पाहून करण्यात येते. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान होत असणाऱ्या ह्या स्थितीचे आपल्या व्यक्तिगत कुंडलीवर होणाऱ्या प्रभावाचे आकलन करण्यासाठी आपणास अनुभवी ज्योतिषांची गरज आहे. जे ह्या ग्रहांची युती व त्यांच्या दुष्प्रभावाचे सटीक अनुमान व निवारणाचे उपाय दर्शवू शकतील. आम्ही आमच्या अमूल्य ग्राहकांसाठी हि सेवा प्रदान करतो. ज्यामुळे आपली कुंडली व ग्रह स्थिती ह्यातून निर्माण होणाऱ्या नकारात्मक - सकारात्मक प्रभावा प्रति सचिंत राहून त्याचे निवारण करून आपले जीवन सामान्याहून अधिक आनंदी व यशस्वी करू शकाल. आमच्या अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घेण्यासाठी येथे क्लिक करा .... !


गणेशांच्या कृपेने, 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम