वार्षिक वृश्चिक राशि फल

हे वर्ष

2020

ह्या वर्षात आपली अपूर्ण राहिलेली कामे आपण पूर्ण करू शकाल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने आपणास नवीन आयोजनाचा मार्ग सापडेल. आपण मागील काही दिवसांपासून कमी बोलत आहात किंवा संपर्क सुद्धा पूर्वीच्या मानाने कमी करत आहात. वर्षाच्या सुरवातीस हि स्थिती अशीच राहील, मात्र फेब्रुवारी मध्यापासून त्यात सुधारणा होऊ शकते. विशेषतः लोकांच्या भेटीगाठी किंवा इतरांशी चर्चा वाढतील. संपर्काची नवीन साधने व सामाजिक माध्यमात आपण अधिक सक्रिय राहाल. मात्र, आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाणार नाही ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल, अन्यथा आपल्या संबंधात कटुता निर्माण होऊ शकते. आपणास अनेकदा वैभवी जीवनशैलीचा व महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल. नकारात्मकते कडून आपण सकारात्मकतेकडे आपण मार्गक्रमण कराल व त्यामुळे प्रत्येक कार्यात व जीवना विषयी आपला आत्मविश्वास वाढेल. मात्र अति आत्मविश्वास बाळगू नका, अन्यथा अडचणीत सापडावे लागेल. ह्या वर्षात आपण आपली हौसमौज सढळहस्ते पूर्ण कराल, मात्र तसे करताना आपल्या मर्यादित प्राप्तीचा विचार करूनच खर्च करावा. व्यावसायिक आघाडीवर आपण उत्तम प्रगती साधू शकाल व बहुतांश वेळा आपली कार्ये प्रगतिलक्षीच असतील. अखेरच्या तिमाहीत भागीदारी कार्यात काळजी घ्यावी. संबंध उत्तम राहतील. व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात प्रियव्यक्तीचा सहवास व सहकार्य मिळवू शकाल. बहुतेक वेळा प्रियव्यक्तीशी किंवा वैवाहिक जोडीदाराशी सलोखा राहील. एप्रिल ते जुलै दरम्यान संबंधांचे उत्तम सौख्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वर्ष अखेरीस स्थितीत थोडी सुधारणा झाली तरी खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास इतरांकडून आर्थिक मदत घ्यावी लागेल. विशेषतः आपल्या प्राप्तीत अनिश्चितता राहिल्याने खर्चाचे पूर्व नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम असले तरी भविष्यातील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याच्या कार्याच्या किंवा वाटाघाटीच्या दरम्यान काळजी घ्यावी लागेल. सप्टेंबर महिन्या नंतर आपल्या अभ्यासात अजाणतेपणाने काही अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्यास विशेष त्रास होणार नसला तरी नाक - कान - घसा ह्यांच्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.