बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
2021
मीन राशीचे जातक अति संवेदनशील असतात. हीच संवेदनशीलता काहीवेळा त्यांची मोठी शक्ती ठरते तर काहीवेळा मोठी अनिवार्यता सुद्धा. प्रणयी जीवनात पुढे होताना कोणावरही एकदम विश्वास न ठेवण्याची काळजी घेतल्यास आपला विश्वासघात होणार नाही. २०२१ दरम्यान आर्थिक आघाडीवर आपणास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. त्यामुळे कोणत्याही आर्थिक समस्येस आपणास सामोरे जावे लागणार नाही. आपले साहस व पराक्रम वाढल्याने कोणतेही जोखीम पत्करण्याची आपली तयारी असेल. ह्याच वृत्तीमुळे आपण व्यापारात प्रगती साधू शकाल. इतकेच नव्हे तर आपण मित्रांना सुद्धा सहकार्य करून त्यांच्या खांद्यास खांदा लावून मार्गक्रमण कराल, व त्यामुळे आपली सामाजिक प्रतिमा उंचावून आपल्या अनुयायांच्या संख्येत भर पडेल. कौटुंबिक वातावरण आशास्पद राहिल्याने कुटुंबियांच्या सहवासात राहण्याची आपणास संधी मिळेल. आपणास ज्या काही गोष्टी समजून घेण्याची इच्छा असूनही अजून समजल्या नसतील त्या सुद्धा आता समजू शकतील. आपल्या वडिलांना काही ना काही शारीरिक त्रास ह्या वर्षात वारंवार होण्याच्या शक्यतेमुळे २०२१ दरम्यान मीन राशीच्या जातकांना आपल्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशी जाण्याचे स्वप्न बाळगून असणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष विशेष अनुकूल नसल्याने आपण जर थोडा धीर धरलात तरच काही प्रमाणात यश प्राप्त होऊ शकेल. आपणास काही वडिलोपार्जित संपत्ती ह्या वर्षात मिळू शकेल. हे आपल्या अपेक्षेनुसार असल्याने आपण खूप आनंदित व्हाल. ह्या वर्षात भरपूर प्रवास संभवतात. आपल्या प्रवासा दरम्यान समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी परिचय झाल्याने त्याचा आपणास भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकेल. आपणास परदेशी स्रोतातून व विदेशी माध्यमांच्या मदतीने मोठा आर्थिक लाभ होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. मीन राशीच्या जातकांना आपल्या आईमुळे बऱ्याच गोष्टीत मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपणास स्वतःच्या प्रयत्नानेच चांगले यश प्राप्त होणार असल्याने इतरांवर विश्वास ठेवण्या ऐवजी स्वतःवरच विश्वास ठेवावा. त्यामुळे आपला फायदा व आत्मविश्वास सुद्धा वाढेल.