वार्षिक तूळ राशि फल

हे वर्ष

2021

तूळ राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष सामान्य फल देणारे आहे. आपणास जीवनातील काही क्षेत्रात चांगली तर काही क्षेत्रात सर्वोत्तम फले मिळणार असली तरी काही क्षेत्रात आपणास अधिक लक्ष देणे गरजेचे ठरेल. ह्या वर्षात तूळ राशीच्या व्यक्तींना छोटीशी आरोग्य विषयक समस्या सुद्धा त्रासदायी ठरणार असल्याने स्वतःच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आवश्यकतेनुसार किंवा काही आवश्यक कार्यांसाठी आपणास कुटुंबा पासून काही दिवसांसाठी विभक्त व्हावे लागण्याच्या शक्यतेमुळे कौटुंबिक दुराव्याचे दुःख आपणास सहन करावे लागू शकते. कुटुंबियांना सुद्धा आपली अनुपस्थिती जाणवेल. आर्थिक आघाडीसाठी हे वर्ष सामान्य परिणाम देणारे आहे. अधून मधून आपणास काही मोठा लाभ सुद्धा होईल, मात्र एकंदरीत मिळणारे फल हे सामान्यच असेल. ह्या वर्षी काही नवीन संबंध जुळू शकतात. आपले मित्र व नातेवाईक आपल्या सुखास कारणीभूत होतील. आपल्या चांगल्या कार्यात हि मंडळी आपल्या खांद्यास खांदा लावून मदत करतील. २०२१ दरम्यान विनाकारण व अनिच्छेने आपणास अनेक प्रवास करावे लागल्याने आपल्याला मानसिक त्रास सोसावा लागेल. आपल्या आर्थिक स्थितीवर सुद्धा ह्याचा भार पडण्याची शक्यता असल्याने आपणास काळजी घ्यावी लागेल. जर प्रवासास जाणे गरजेचे असेल तर पूर्ण तयारी करूनच जावे. ग्रहांच्या स्थिती नुसार आपले चतुर्थ व दशम स्थान प्रभावित होत असल्याने आपले कौटुंबिक व व्यावसायिक जीवन ह्यात समतोल साधावा लागेल, अन्यथा आपल्या हातून गोष्टी निसटून जातील व दोन्ही क्षेत्रात आपल्यावर आव्हानांना सामोरे जाण्याचा दबाव येईल. असे असले तरी आपली तूळ रास असल्याने जीवनात समतोलपणा राखण्याचे कौशल्य निसर्गतः आपल्यात असल्याने आपल्या कौशल्याचा यथोचित वापर करून आपण यश प्राप्त करू शकाल. २०२१ दरम्यान आपल्या मातेची प्रकृती नाजूक होण्याच्या शक्यतेमुळे आपणास तिच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. काही विशिष्ट परिस्थितीत आपणास मातेस रुग्णालयात सुद्धा दाखल करावे लागू शकते. मानसिक दृष्ट्या आपणास हि स्थिती काळजीत ठेवणारी सुद्धा असेल. आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपणास ह्याच्या परिणामांसाठी तयारी करावी लागेल. आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या समजून घेऊन कर्तव्यांचे पालन करावे व गरज भासल्यास कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्यांचा सल्ला सुद्धा घ्यावा कि ज्यामुळे आपणास योग्य प्रकारे कार्य करणे सहज शक्य होऊ शकेल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.