वार्षिक मकर राशि फल

हे वर्ष

2020

हे वर्ष आपल्यासाठी एकंदरीत चांगले आहे. आपणास प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. व्यावसायिक आघाडीवर आपण मोठे ध्येय गाठू शकाल. ह्या वर्षी आपण प्रगतीसाठी नवीन ध्येय निर्धारित करून ते पूर्ण करण्याची व्यूहरचना आखण्याची शक्यता आहे. कामाप्रती अभिरुचीत व विचारसरणीत नाविन्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. फेब्रुवारी नंतर कामाप्रती आपणास आळस वाटू लागला तरी आपला उत्साह जर कमी केला नाहीत तर त्यात विशेष फरक पडणार नाही. नोकरीत वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळून नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. वर्षभर आपण आत्मप्रेरित राहण्यास विसरू नका. ह्या वर्षी नवीन काही करण्यास हरकत नसली तरी जर आपले कौशल्य व ज्ञान वृद्धीसाठी प्रयत्न केल्यास भविष्यात कारकिर्दीत खूप मोठा फायदा होऊ शकेल. व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढ - उतार येतील परंतु समाधानी वृत्ती बाळगल्यास संबंधातील समतोल आपण साधू शकाल. सध्या आपले ज्यांच्याशी संबंध आहेत त्यांच्या बद्धल आपण अधिक भावनाशील होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान आपल्या जीवनात प्रणयास अधिक महत्व असेल. ह्या दरम्यान आपण नवीन संबंधाची सुरवात करण्याचा किंवा असलेल्या संबंधास नवीन वळण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. ह्या वर्षात आपल्या जीवनात असे काही प्रसंग उदभवतील कि पैश्यापेक्षा संबंधास किती जास्त महत्व असते ह्याची आपणास जाणीव होईल. कारकिर्दीच्या बाबतीत वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण त्यांचे मन जिंकू शकाल. त्यांच्या मनात आपल्या विषयी आदर निर्माण होऊन त्यांचे आशीर्वाद जीवनात प्रगती साधण्यासाठी मदतरूप ठरतील. व्यावसायिक आघाडीवर मार्च ते मे महिन्या दरम्यान चांगली संधी मिळण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. प्रणयी जीवनासाठी वर्षाच्या सुरवातीचे दिवस अनुकूल असून फेब्रुवारीच्या मध्या नंतर आपल्या प्रिय व्यक्तीस खुश ठेवण्यासाठी आपणास अधिक सक्रिय राहावे लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त झाले तरी उत्तरार्धात त्यांना थोडी मेहनत वाढवावी लागेल. विशेषतः सप्टेंबर नंतरच्या काळात अभ्यासात आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी पासूनच जर अभ्यासा बाबतीत अधिक जागरूक राहिलात तर फायदा होऊ शकेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्षाची सुरवात चांगली असली तरी ऋतुमानातील बदलाचा संभाव्य त्रास टाळण्यासाठी व्यायामातील नियमितता व आहारावर विशेष लक्ष द्यावे लागेल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.