वार्षिक कर्क राशि फल

हे वर्ष

2020

हे वर्ष संघर्षांसह सुखद अनुभव देणारे आहे. जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण मार्गक्रमण कराल. मात्र वर्षभर सतत आपल्या भावनात चढ - उतार होत असल्याचे दिसून आल्याने अधून मधून आप्तांपासून दूर जाल. मात्र, अशा परिस्थितीत जर आपल्या ऐवजी त्यांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा अभ्यास केलात तर त्याचे उत्तम परिणाम मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात किंवा जागेत बदल होण्याची शक्यता असून त्याचा कालांतराने आपणास फायदा होईल. जर आपल्यावर कामाचे ओझे असेल किंवा प्रकल्प पूर्ण करण्यात विलंब होत असेल तर फेब्रुवारी पासून त्यात सुधारणा होऊ लागेल. फेब्रुवारीच्या मध्या पासून नोकरीत आपला उत्साह वाढल्याने सहकाऱ्यांशी काही कटुता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आजवर व्यावसायिक आघाडीवर होत असलेला विलंब जानेवारी नंतर ओसरताना व कामाचे ओझे सुद्धा कमी होताना दिसू लागेल. भागीदारी कार्यात किंवा नवीन करारात फेब्रुवारी नंतर विलंबाची शक्यता असल्याने त्यापूर्वीच त्यांची पूर्तता करावी. संबंधात सानिध्य टिकून राहील. वर्षाच्या मध्यास आपण प्रणयी जीवनात अधिक मग्न राहाल. फेब्रुवारी नंतर संबंधात वैविध्य राखण्यात व जोडीदारास खुश ठेवण्यात आपणास कष्ट करावे लागतील. अशा परिस्थितीत प्रसंगानुसार भेटवस्तू देऊन आपल्या जोडीदाराशी जवळीक साधू शकाल. धार्मिक कारणांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. शक्यतो सप्टेंबर महिन्या पर्यंत कोणाशीही उधार उसनवारी करणे टाळावे. ह्या दरम्यान काही ना काही कारणांनी अनेकदा प्रवास करावे लागतील. वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून किंवा स्रोता कडून आर्थिक किंवा अन्य लाभ मिळवू शकाल. मात्र, शेअर्स किंवा तत्सम काम करणाऱ्याना सप्टेंबर महिन्या नंतर खूपच सावध राहावे लागेल, अन्यथा मोठ्या नुकसानास सामोरे जावे लागेल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी चांगले असले तरी प्रवेश परीक्षा किंवा नेहमीच्या परिक्षां व्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमात थोडी जास्त मेहनत करावी लागेल. सप्टेंबर महिन्या नंतर आपणास अभ्यासात खूप मेहनत वाढवावी लागेल. ह्या वर्षात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आजारपण बळावण्याची शक्यता आहे. मेदवृद्धी, मधुमेह इत्यादींशी संबंधित विविध समस्या होण्याची जास्त शक्यता ह्या वर्षात आहे.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.