वार्षिक कुंभ राशि फल

हे वर्ष

2021

कुंभ राशीच्या व्यक्ती खूप विचारशील असतात व आपल्या ह्या स्वभावामुळे ते बरेचदा अचूक निर्णय घेऊ शकतात. असे असले तरी काहीवेळा त्यांना आपल्या निर्णयात बदल सुद्धा करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना आपल्या विवेकबुद्धीचा आश्रय घ्यावा लागतो. हीच विवेकबुद्धी २०२१ दरम्यान कुंभ राशीच्या जातकांच्या मदतीस येईल. ह्या वर्षी आपणास आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. इतकेच नव्हे तर आपल्या प्राप्तीपेक्षा खर्च जास्त होऊन आपल्यावर पश्चातापाची पाळी येऊ नये म्हणून आपल्या खर्चिक वृतीवर आळा सुद्धा घालावा लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहिले तरी कामाच्या व्यस्ततेमुळे आपण कुटुंबा पासून दूर व्हाल किंवा कौटुंबिक सौख्यास पारखे व्हाल व त्यामुळे आपणास सतत कुटुंबीयांची आठवण येत राहील. असे असले तरी कामास महत्व दिल्यामुळे आपणास कुटुंबियांपासून दूरच राहावे लागेल. २०२१ दरम्यान आपले विरोधक परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या विरुद्ध कट - कारस्थान रचून आपणास व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात त्रास देण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत विरोधकांवर मात करण्यासाठी आपणास सतर्क राहावे लागेल. नोकरी व व्यापाराच्या दृष्टीने हे वर्ष शुभ फलदायी राहणारे असून आपणास नवीन काही शिकविणारे आहे. सर्वस्व गमावून सुद्धा इतरांना मदत करण्याची वृत्ती आपल्यात निर्माण होईल जी आपणास लोकप्रिय होण्यास कारणीभूत ठरेल व त्यामुळे जीवनातील आपले स्थान उंचावले जाण्यास मदत होईल. आपण आपल्या कुटुंबीयांची संपूर्ण जवाबदारी उचलून आवश्यकतेनुसार त्यांना आर्थिक मदत सुद्धा कराल. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाताना आपण त्यांना एकटे सोडणार तर नाहीच परंतु त्यात सहभागी सुद्धा व्हाल. ह्याचमुळे आपणास कुटुंबात महत्व प्राप्त होईल. आपणास जर एखादे मोठे भावंड असेल तर त्याच्याशी संबंध बिघडून आपले नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी जे काम आपल्या योग्य आहे ते आपणास मिळत नसल्याचे अनेकदा आपणास वाटत राहिल्यास परिस्थितीचे अचूक आकलन करण्याचा प्रयत्न करा. वास्तविक स्थिती तशी नसून तो आपला भ्रम ठरण्याची शक्यता असल्याने चुकीचे पाऊल उचलू नये. कुंभ राशीचे जे जातक परदेशी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी २०२१ चे वर्ष अत्यंत अनुकूल असून त्यांच्या प्रयत्नात ते यशस्वी होऊ शकतील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.