बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
08-12-2019 - 14-12-2019
ह्या आठवड्याचे ग्रहमान बघता आपण कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवू शकाल असे दिसते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी महत्वाची चर्चा होऊ शकेल. आपण आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊन कार्यात पुढे मार्गक्रमण करू शकाल. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. मात्र, धावपळीमुळे पित्त प्रकोप, पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास किंवा भोजनातील अनियमितेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे. आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे चर्चेत भाग घेण्याची आपली इच्छा होईल, परंतु आपले म्हणणेच खरे असल्याचा हट्टीपणा सोडावा लागेल, अन्यथा संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सलोखा राहील. आर्थिक लाभ सुद्धा संभवतात. भावंडांकडून लाभ होतील. आपली आध्यात्मिक व धार्मिक वृत्ती आपणास सेवा कार्य किंवा गरजवंतास मदत करण्याची प्रेरणा देईल. जीवनाचे रहस्य शोधण्यासाठी आध्यात्मिक गुरूंना आपण शरण जाण्याची शक्यता सुद्धा आहे. शारीरिक तजेला व मनाची प्रसन्नता जाणवेल. मित्र, स्वजन ह्यांच्यासह सहलीस किंवा प्रवासास जाण्याचे आयोजन करू शकाल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपले मन आनंदित होईल.