बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
28-02-2021 - 06-03-2021
हा आठवडा आपणास बरेच काही देणारा आहे. आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. लोक आपली प्रशंसा करतीलच व आवश्यक कामांसाठी आपला सल्ला घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे येतील. आपले आरोग्य उत्तम राहील वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागतील. सासुरवाडीकडील परिस्थितीत सुद्धा सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात आपणास डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. डोळेदुखी किंवा डोळ्यास इजा संभवते. प्राप्ती थोडी कमी होईल व खर्च मात्र वाढतील. त्यामुळे आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. नोकरीत आपल्या कामाचे यथोचित फळ मिळेल. नशिबाची सुद्धा साथ मिळेल. व्यापारी वर्गास आपल्या व्यापार वृद्धीसाठी प्रतिष्ठित व्यक्तीचे सहकार्य मिळेल.