बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
Dec 2019
ह्या महिन्याच्या पूर्वार्धात प्रियजनांचा सहवास आपणास सुखावेल. संबंधात भावनांचा आवेग वाढेल. उत्तरार्धात आपल्यात भिन्नलिंगी आकर्षण राहील, परंतु संबंधात समर्पण भावना असावी. उत्तरार्धात आपणास स्वतःच्या जोडीदाराप्रती अधिक कटिबद्ध असणे गरजेचे राहील. सुरवातीच्या पंधरवड्यात आर्थिक फायदा होऊ शकेल तर उत्तरार्धात हौसमौज व वैभवी जीवनशैलीसाठी मोठा खर्च करण्यात आपण मागे राहणार नाहीत. अशा परिस्थितीत प्राप्ती व खर्च ह्यात समतोल साधण्याची तसेच आपल्या आर्थिक गरजां नुसार पाऊल उचलण्याची जवाबदारी आपली स्वतःची असेल. घर, वाहन किंवा जमिनीशी संबंधित कार्यात फायदा होऊ शकेल. व्यावसायिक आघाडीवर पूर्वार्धात विशेषतः प्रिंटिंग, रसायन, सरकारी कार्यात चांगली प्रगती करू शकाल. उत्तरार्धात आपणास अनेक लाभ मिळू शकतील. मात्र, शेवटच्या आठवड्यात प्रत्येक आघाडीवर सावध राहावे लागेल. प्रेम प्रकरणाची सुरवात किंवा विवाहाचा निर्णय घेण्यास हा महिना अनुकूल नाही. अधिक भावनाशील होऊन कोणताही निर्णय घेऊ नये. तसे पाहिल्यास आपले आरोग्य चांगलेच राहील मात्र, उत्तरार्धात चेतासंस्थेशी संबंधित त्रास, स्नायूंचे दुखणे ह्यांच्या समस्या उदभवण्याची शक्यता आहे.