केवळ आपल्यासाठीच भविष्यकथन

आपली सूर्यरास निवडा

साप्ताहिक

हा आठवडा आपल्या आनंदात भर घालणारा आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपणास जीवनातील आनंद अनुभवता येईल. आपल्या प्रणयी जीवनात प्रगती होईल. आपल्या प्रियव्यक्तीशी आपल्या व्यवसाया विषयी चर्चा करून तिचा व्यवसायासाठी अभिप्राय घेऊन तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न आपण कराल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक...

पुढे वाचा

मासिक

ह्या महिन्याची सुरवात आपल्यासाठी खूपच चांगली होईल. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक योजनांना आपण यशस्वी करू शकाल व त्यामुळे आपली स्थिती अधिक बलवान होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना इतरांना मदत करण्याचा व कार्यरत राहण्याचा आनंद उपभोगता येईल व त्यामुळे काही लाभ पदरी पाडून घेता येतील. त्यांची प्रशंसा सु...

पुढे वाचा

वार्षिक

मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२१ हे वर्ष अत्यंत आशास्पद असणार आहे. आपल्या बहुतांश योजना आकारास येतील, ज्यात ह्या वर्षी आपणास आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळून आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांचे संपूर्ण लक्ष आपल्या कामावर असल्याने त्यांच्या क्षेत्रात त्यांना चांगले पद मिळण्याची शक्यता ...

पुढे वाचा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.

जन्मकुंडलीबद्दल

आकाशस्थ ग्रहांच्या नकाशाला वैदिक ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडली असे म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्र हे पराशर मुनींनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ' बृहत पाराशर होराशास्त्र ' ह्या प्राचीन ग्रंथावर आधारित असून जन्मकुंडली हा त्या शास्त्राचा आधारस्तंभ आहे. पराशराला ज्योतिषशास्त्राचे जनक मानले जाते. एका विशिष्ट ठिकाणाहून एका विशिष्ट वेळी आकाशात पाहिल्यावर दिसणारी ग्रहस्थिती जन्मकुंडलीत दाखवलेली असते. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर, जन्मकुंडली हे जन्माच्या वेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचे चित्ररूप वर्णन असते. समोरील व्यक्तीच्या आयुष्याचे आणि भविष्यकाळाचे सूचन करण्यासाठी ज्योतिषी एकतर जन्मकुंडली (जन्माच्या वेळचा ग्रहांचा नकाशा ) वापरतो नाहीतर प्रश्नकुंडली (ज्या वेळेला प्रश्न विचारला असेल, त्यावेळेचा ग्रहांचा नकाशा) वापरतो. ती कुंडली हाच ज्योतिषशास्त्रीय भविष्यकथनाचा पाया असतो. कुंडलीचे अस्तित्व गणिती तत्वांवर आधारलेले असते, म्हणूनच त्यावरून केलेले भविष्यसूचन बहुतेक वेळा अचूक येते. विवाहेच्छू वधू वरांची अनुरूपता देखील कुंडलीच्या आधारे तपासून पाहिली जाते. व्यवसाय किंवा इतर कोणतीही गोष्ट नव्याने सुरु करण्यासाठी, त्याप्रमाणेच शुभकार्यासाठी सुद्धा योग्य मुहूर्त शोधण्यासाठी कुंडलीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.