आचार्य कृष्णमूर्ती

क्षमता

वैदिक ज्योतिषशास्त्र, लाल किताब, त्यांनी कृष्णमूर्ती पद्धतीबद्दल सखोल संशोधन करून त्यावर प्रभुत्व संपादन केले आहे. ज्योतिषशास्त्रावर त्यांचे मनापासून प्रेम आहे. कोणत्याही कुंडलीचे ते संपूर्ण विश्लेषण करतात आणि समोर असलेला प्रश्न पूर्णपणे सुटला की मगच त्यांचे समाधान होते. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि त्या आधारे इतरांचे मार्गदर्शन ह्याला ते स्वतःचा धर्मच मानतात. त्यामुळे भौतिक जगाकडे त्यांचे फारसे लक्ष नसते. ज्योतिषशास्त्राकडे ते अतिशय गंभीरपणे, मनापासून लक्ष देतात, कारण एक योग्य निष्कर्ष कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो असे त्यांना वाटते.

कार्यसिद्धी

कृष्णमूर्ती पद्धतीवर त्यांनी बऱ्याच परिसंवादांमध्ये भाषणे केली असून ज्योतिषशास्त्रावर लेखही लिहीले आहेत. ह्या दोन्ही गोष्टींचा ह्या क्षेत्रात नव्यानेच येऊ इच्छिणाऱ्यांना बराच फायदा झाला आहे. क्रिकेट, राजकारण, भारतात व परदेशात झालेल्या निवडणुका आणि इतरही बऱ्याच विषयांबद्दल आगाऊच अचूक भाकिते केली होती.

पार्श्वभूमी

त्यांच्या कुटुंबात ज्योतिषाचा अभ्यास परंपरेने चालत आला आहे. त्यामुळे ह्या विषयातील ज्ञान त्यांना सहजपणे मिळाले आहे. पुढे त्यांनी ज्योतिषशास्त्राचा शास्त्रोक्त अभ्यास केला आणि तर्काधारित भविष्यकथनाचा सिद्धान्त आपलासा केला. त्यांना भारतात आणि परदेशातही गुरुजी संगमजी ह्या नावाने ओळखले जाते.

अनुभव

२० वर्षे

विशेष प्राविण्य

के.पी. पद्धत, क्रिकेट, फुटबॉल, विवाह, संतती जन्म आणि इतर बरेच प्रश्न

छंद

ध्यानधारणा, सूफी संगीत (भक्तिसंगीत) ऐकणे, आत्मिक उन्नती होण्यासाठी आणि आत्मज्ञान होण्यासाठी आध्यात्मिक साहित्याचे वाचन करणे.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

ते म्हणतात की, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला असे वाटते की, एखाद्या बीमधून कशा प्रकारचे झाड तयार होणार आहे, ह्याची माहिती त्या बी मध्ये लिहिलेली असते, त्याचप्रमाणे जन्मकुंडलीत दडलेल्या सगळ्याच शक्यतांचा अंदाज तुम्हाला यायला हवा. त्यांना असेही वाटते की, जन्मजात कौशल्ये जन्मकुंडलीत लपलेली असतात. ती तुम्हाला समजून घेता आली, तर तुम्हाला १००% यश मिळू शकते. जन्मजात कौशल्यांच्या ऐवजी जर तुम्ही स्वतः बाहेरून, प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या कौशल्यांच्या साहाय्यानेच काम करत राहिलात, तर तुम्हाला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. सगळे जग आणि निसर्ग एकमेकांशी भांडणे न करता, सुसंवाद साधून राहतात. जर आपणही सुसंवाद साधून राहू शकलो, तर यशापासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकणार नाही. अशा प्रकारे कसे राहता येईल, हे तुमच्या कुंडलीवरून कळते.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.