आचार्य कार्तिकेय

क्षमता

ह्या व्यवसायाला सुरुवात केल्यापासून श्री. मेनन ह्यांना अध्यात्माशी संबंधित ज्योतिषशास्त्राचाच अधिक अभ्यास करण्याची इच्छा होती. माणसाचे अंतरंग, त्याचे मन हेच समजून घेण्यात त्यांना सर्वात जास्त रस असतो. अशा प्रकारे माणसाचे मन आणि बुद्धी समजून घेतल्याने त्यांचा वापर अतिशय कठीण प्रसंगांमध्ये कसा करावा हे समजते. जर तुमचा परमेश्वरावर आणि स्वतःवर विश्वास असला, तर वैदिक उपायांचा पुष्कळ उपयोग होतो, असा त्यांना विश्वास आहे.

कार्यसिद्धी

1) पदव्युत्तर पदवी – वेदिक इंडियन फिलॉसॉफी अँड वेस्टर्न फिलॉसॉफी (कल्चरल कोर्स)
2) मास्टर्स इन वेदिक ऍस्ट्रॉलॉजी अँड रिसर्च – सुवर्णपदक विजेता
3) मंत्रपठणाचे ज्ञान आहे.
4) बेसिक सर्टिफिकेट इन ऍस्ट्रॉलॉजी – ज्योतिष मार्तंड, सर्वाग्यम, विशारद, आचार्य व महर्षी

पार्श्वभूमी

केरळातील अत्यंत आध्यात्मिक प्रवृत्तीच्या नंबुद्री ब्राह्मण कुटुंबात श्री. मेनन यांचा जन्म झाला. केरळ ह्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण १००% असून तेथील लोक अतिशय धार्मिक वृत्तीचे असतात. तेथे ज्योतिषशास्त्राचे शिक्षक ह्या पदावर काम केले असून भविष्यकथनाचा व्यवसायही केला. तेथे सगळ्यांशी आध्यत्मिक मित्राचे नाते जोडले. त्यांचे वडील टेक्स्टाईल सुपरव्हायझर ह्या पदावर काम करत असून त्यांची आई एक आध्यात्मिक गुरु आहे. एक पवित्र माणूस होण्यासाठी आवश्यक ते सगळे सकारात्मक गुण त्यांच्या आईकडूनच त्यांना मिळाले. त्यांच्या आईनेच त्यांना साधेपणाची व नम्रपणाची दीक्षा दिली. त्यांच्या पत्नी सौ. विजी मेनन यांनी इंग्रजी विषय घेऊन बी.ए. ही पदवी मिळवली आहे आणि त्या अतिशय चांगल्या जोडीदार असून आदर्श पत्नी आहेत. त्यांनी श्री. मेनन यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आईवडील, पत्नी आणि मुलगा ह्यांचे गुणवर्णन करण्यास शब्द पुरत नाहीत अशी त्यांची अवस्था होते.

अनुभव

१२ वर्षेेेे

विशेष प्राविण्य

स्वयंविकास, आर्थिक स्थिती, कौटुंबिक प्रश्न, संतती, शिक्षण, प्रेम, नोकरी, कारकीर्द, परदेशगमन यांच्याशी संबंधित प्रश्न, नकारात्मक उर्जा काढून टाकणे, कुंडलीतील सर्व दोषांचा परिहार करणे

छंद

वैदिक मंत्र, उपनिषदे, भगवद्गीता यांचे पठण करणे, जुन्या चित्रपटातील गाणी म्हणणे, गाडीतून दूरवर फिरायला जाणे, सगळ्यांना मदत करणे. त्यांचे सगळ्या ग्रहांवर अतिशय प्रेम आहे.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

अगदी लहान वयापासून लोकांचे, त्यांच्या सवयींचे, जीवनशैलीचे निरीक्षण करणे श्री. मेनन यांना फार आवडत असे. ते स्वतः खूप काळ ध्यानधारणा करत असल्यामुळे आणि त्यांची अंतःप्रेरणा अतिशय तीव्र असल्यामुळे लोकांचे अंतरंग समजून घेणे त्यांना आवडत असे. असा झगडा बराच काळ चालला होता. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या विलक्षण क्षमता ज्योतिषशास्त्रात वापरण्यास सांगितले. त्यांच्या आईला हे चांगलेच ठाऊक होते की, लोकांची दयनीय अवस्था बघणे श्री. मेनन यांना शक्य नव्हते, कारण अशी दृश्ये पाहून ते रडत असत. त्यांना हे माहिती आहे की, एक ज्योतिषी म्हणून आपण सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहोत. इतरांच्या आयुष्यात बदल करता यावा, ह्यासाठी त्यांना नेहमीच परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.