आचार्य देवस्य

क्षमता

स्पष्ट भविष्यकथन ही श्री. विकेश ह्यांची खास ओळख बनली आहे. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे समोर आलेल्या ग्राहकाच्या प्रश्नाचे विश्लेषण करण्याचे त्यांचे अनोखे तंत्र. ज्योतिष, अंकशास्त्र आणि हस्तसामुद्रिक ह्यांच्या विविध अंगांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

कार्यसिद्धी

विकेशभाईंचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव आणि आयुष्यातील घटना व अनुभव ह्यांचा ज्योतिषशास्त्र आणि कुंडली ह्यांच्याशी असलेला संबंध शोधून काढण्याचे त्यांना अवगत असलेले विलक्षण तंत्र ह्यांच्या योगाने ते ह्या क्षेत्रातील एक कुशल व्यक्ती झाले आहेत. इतक्या वर्षांत खूप मोठ्या संख्येने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या जन्मकुंडल्यांचा अभ्यास केला असल्यामुळे ज्योतिषी म्हणून त्यांची योग्यता खूप मोठी आहे. त्यांनी आजवर जितक्या ग्राहकांना ज्योतिषशास्त्राद्वारे मदत केली आहे, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

पार्श्वभूमी

श्री. विकेश श्रीमाळ ह्यांचा जन्म गुजरातमधील फतेहपुरा येथे १९७० च्या ऑक्टोबर महिन्यात एका जैन कुटुंबात झाला. ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असलेल्या जितक्या व्यक्तींशी ते संपर्कात आले, त्या सगळ्या ज्योतिषांनी वर्तवलेली भविष्ये अचूक येतात असा अनुभव त्यांना आला. त्यामुळे आपण ज्योतिषशास्त्र शिकून त्याचे सखोल ज्ञान मिळवायचे, असे त्यांच्या मनाने घेतले होते. ज्युवेलेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे त्यांनी सोळा वर्षे नोकरी केली. त्या काळात त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर २००२ सालापासून पूर्णवेळ ज्योतिषी म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचे मित्र त्यांना हे काम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे त्यांना ह्या कामासाठी प्रेरणा मिळते.

अनुभव

१४ वर्षे

विशेष प्राविण्य

परदेशी स्थायिक होणे, विवाह आणि कारकीर्द ह्यांच्याशी संबंधित प्रश्न

छंद

ज्योतिषशास्त्राशी संबंधित जितके साहित्य वाचायला मिळेल, तितके साहित्य ते वाचत असतात आणि विविध जन्मकुंडल्यांचे विश्लेषण करून त्यांचा अभ्यास करत असतात. टीव्हीवर दाखवले जाणारे हलकेफुलके कार्यक्रमही ते आवडीने पाहतात.े

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

‘नाण्याच्या दोन बाजूंचा सिद्धांत’ श्री.विकेश यांना पूर्णपणे पटला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ” जर एखादा प्रश्न असला, तर त्याचे उत्तर अस्तित्वात असलेच पाहिजे. कारण परमेश्वर त्याच्या प्रजेला कठीण प्रसंगात एकटेच सोडून देणार नाही. ज्योतिषशास्त्र हे त्या प्रश्नांवरची उत्तरे शोधण्याचा एक अतिशय चांगला मार्ग आहे. परमेश्वराच्या मनात असलेली उत्तरे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून चांगल्या प्रकारे समजतील.”

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.