आचार्य महर्षी

क्षमता

ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र आणि मुद्राविज्ञान ह्यांच्यावर त्यांची पूर्ण हुकुमत आहे.

कार्यसिद्धी

घरातील ज्येष्ठ मंडळी आणि आईवडील ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि इतर सगळ्या शुभचिंतकांच्या शुभेच्छा ह्यांच्यामुळे ते आज एक यशस्वी ज्योतिषी म्हणून गणले जातात.

गणेशास्पीक्स.कॉम ह्या कुटुंबात ते १६ सप्टेंबर २००३ पासून सामील झाले. तेव्हापासून ते असंख्य ग्राहकांचे मित्र आणि मार्गदर्शक झाले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच ते सगळे ग्राहक आता सुखासमाधानाने आपले आयुष्य व्यतीत करत आहेत.

पार्श्वभूमी

ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या श्री. जितूभाई ठक्कर यांना वयाच्या तेराव्या वर्षापासूनच ज्योतिषशास्त्राची आवड लागली. तेव्हा ते पंचांग विकत घेऊन त्याचा अभ्यास करत असत. ते म्हणतात की, ह्या दैवी शास्त्राचे सामर्थ्य पाहून ते आश्चर्यचकित होत आणि ते सगळे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असत. त्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांनी काही ज्योतिषांकडे तीन वर्षे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. पुढे पदवी मिळवल्यानंतर त्यांनी न्याय विजय ज्योतिष इन्स्टिट्यूट येथून ज्योतिष विशारद हा अभ्यासक्रम वयाच्या चोविसाव्या वर्षी पूर्ण केला. त्यांचे वडील श्री. मफतलाल ठक्कर हे शिक्षक होते. त्यांनी दिलेला एक महत्वाचा सल्ला जितूभाई शिरसावंद्य मानतात. त्यांना वडिलांनी सांगितले होते, ” आयुष्यात तू कोणावरही अन्याय करू नकोस. सगळ्यांशी मित्रत्वाने वाग आणि सगळ्यांना, विशेषकरून वयस्कर व्यक्तींना, मदत कर.”

त्यांच्या पत्नी पदवीधर असून त्यांनी संगणकाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांच्याकडून श्री. जितूभाईंना पूर्ण पाठबळ आणि प्रोत्साहन मिळते. वयाच्या ४६व्या वर्षी ते योगाचा आणि नाडीशास्त्राचा अभ्यास करत असून आयुष्यात नेहमी प्रगती करत राहण्याचा त्यांचा मानस आहे.

अनुभव

१८ वर्षेे

विशेष प्राविण्य

प्रेम, संतती, वैवाहिक आयुष्य आणि वैद्यकीय ज्योतिषशास्त्र ह्यांच्याशी संबंधित बाबींवर त्यांचे प्रभुत्व असून त्यांचा हस्तसामुद्रिकाचाही चांगला अभ्यास आहे. त्यांना मनोविज्ञानाचेही चांगले ज्ञान आहे.

छंद

ज्योतिषशास्त्रातील नवनवीन गोष्टी शिकणे, क्रिकेटचे सामने व चित्रपट पाहणे, जुन्या चित्रपटांतील गाणी ऐकणे, गरब्याची गाणी म्हणणे आणि गरबा खेळणे.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

ज्योतिषशास्त्राच्या मदतीने लोकांना योग्य दिशा दाखवणे हा एकमेव हेतू त्यांच्या मनात आहे. ते खात्रीपूर्वक म्हणतात की, ” ज्योतिष हे एक गूढ शास्त्र असून ते वैदिक पायावर उभारलेले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे, म्हणजे अजिबात अंधविश्वास नाही. म्हणूनच शास्त्रज्ञसुद्धा त्याचा आधार घेतात कारण ते एक अचूक आणि पूर्ण शास्त्र आहे. त्याच्या ह्या गुणांमुळेच ज्योतिषशास्त्र लोकांना स्वतःच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यास मदत करते.” ते नेहमी म्हणतात की, ” लोकांच्या जीवनाचे गुणात्मक मूल्य वाढवणे, हेच माझे अंतिम ईप्सित आहे.”

लगेच संवाद साधा

.buynow-btn-fixed { float:right; margin-top:2px;}

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.