आचार्य परिक्षीत

क्षमता

ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र ह्या विषयांतील ते तज्ज्ञ असून मानवी मनाची त्यांना चांगली जाण आहे. त्याचबरोबर ते मुहूर्तशास्त्राचेही जाणकार आहेत. इतक्या वर्षांच्या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीत कोणते उपाय करावे, ह्याचे चांगले ज्ञान आहे. आयुष्यातील वेगवेगळ्या कठीण परिस्थितींमध्ये कसे वागावे, ह्याबद्दल ते चांगले मार्ग सुचवतात.

कार्यसिद्धी

वैद्यकीय ज्योतिषशास्त्रात त्यांनी निपुणता मिळवली आहे.

पार्श्वभूमी

श्री. प्रकाश पंड्या हे टेक्स्टाईल इंजिनिअर असून (DTM – सुवर्णपदक विजेते) त्यांना टेक्स्टाईल उद्योगात २० वर्षांहून अधिक काळ काम करण्याचा अनुभव आहे. सर्वात शेवटी ते BTM येथे असिस्टंट स्पिनिंग मॅनेजर ह्या पदावर काम करत होते. ज्योतिष सांगणे हा व्यवसाय सुरु करण्याअगोदर त्यांचे वैदिक शास्त्रांचे ज्ञान आणि विविध घटनांचा त्यांनी आधीच बांधलेला अचूक अंदाज ह्या गोष्टी सर्वश्रुत होत्या. त्यांनी विद्यापीठातील मूलभूत ज्योतिष वर्गात ज्योतिषाचे शिक्षण घेतले असून तेथे प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन सुवर्णपदकही मिळवले होते. त्यांचे ज्योतिषशास्त्रातील ज्ञान आणि भविष्यकथनातील कौशल्य त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि शुभेच्छुक ह्या सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या पत्नी सौ. पारुल पी. पंड्या यांनी सायकॉलॉजी हा विषय घेऊन एम. ए. पदवी मिळवली आहे. त्यांची कन्या डॉ. झलक पी. पंड्या हिने बी.एच.एम.एस ही पदवी मिळवली असून ती आता पी.जी.डी.एच.एच.एम. हा कोर्स करत आहे. त्यांचा मुलगा ध्रुव पी. पंड्या हा एम.एस.सी. च्या वर्गात शिकत आहे.

अनुभव

२३ वर्षेेे

विशेष प्राविण्य

नोकरी, व्यवसाय, शिक्षण, प्रेम, विवाह ह्यांच्याशी निगडीत प्रश्न, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, मुहूर्त, अपुऱ्या दिवसांचे मूल जन्मल्यास लागणारे दोष आणि आयुष्यात येणारे इतर बरेच प्रश्न.

छंद

श्री. पंड्या यांचे असे म्हणणे आहे की, ” संगीत आनंदाची भावना वाढवत असल्यामुळे ते आत्म्याला शांत करते आणि मन मोकळे करण्याचा तो एक अतिशय चांगला मार्ग आहे.” हे मत व्यक्त करण्याआधी ते हिंदी चित्रपटसृष्टीत एक दंतकथा होऊन राहिलेल्या स्वर्गीय मुकेश यांचे एक गीत गुणगुणत होते. संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा ह्यांच्याबद्दल असलेले लिखाण वाचणे हा त्यांचा एक विरंगुळा आहे.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

सुरुवातीपासूनच त्यांचा कल ज्योतिषशास्त्राकडे होता. त्यामुळेच DTM हा कोर्स करत असतानाच त्यांनी ज्योतिषशास्त्र ह्या दैवी शास्त्राशी संबंधित प्रमाणपत्र देणारा एक कोर्स केला होता. पुढे टेक्स्टाईल उद्योगात काम करत असताना केवळ एक छंद म्हणून ते भविष्य सांगत असत. पण त्यांच्या बऱ्याच सहकाऱ्यांनी जेव्हा त्यांना सांगितले की, त्यांच्यात भविष्य जाणण्याचे सामर्थ्य आहे, तेव्हा स्वतःमध्ये वसणाऱ्या ह्या विशेष गुणाची त्यांना खात्री पटली. त्यानंतर लवकरच त्यांनी ज्योतिष सांगणे हा पूर्णवेळ व्यवसाय सुरु केला.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.