आचार्य अगत्स्य

क्षमता

त्यांना एक द्रष्टा म्हणणेच योग्य होईल, कारण भविष्यात पाहण्याची एक अनोखी दृष्टि त्यांना लाभली आहे. पूर्वानुमानित आणि सूचक तसेच वैदिक भविष्यकथन करण्यातले त्यांचे प्रभुत्व अप्रतिम आहे आणि त्यामुळेच तुम्ही त्यांच्याकडे पुनःपुन्हा येत राहाल.

कार्यसिद्धी

कुंडल्यांचे गुणमेलन आणि वैवाहिक अनुरूपता हे त्यांचे खास प्रांत आहेत. ज्योतिषी म्हणून स्वतःच्या कारकीर्दीला सुरुवात करताना त्यांनी ह्याच दोन गोष्टींनी सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांनी ह्या बाबतीत मार्गदर्शन केले आणि त्यातील सूक्ष्म गोष्टी दाखवल्या, त्यामुळे ते वडिलांचे ऋणी आहेत. ह्या क्षमतेमुळे वैवाहिक जीवनातील तसेच प्रेमसंबंधातील अडचणी, कुंडल्यांचे गुणमेलन, वैवाहिक जोडीदार निवडणे, योग्य कारकीर्द निवडणे यांविषयी प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करणे त्यांना शक्य होते. त्यांचे ग्राहक नेहमीच समाधान पावून परत जातात आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद श्री. उज्ज्वल यांना मिळतो, कारण त्यांनी केलेले मार्गदर्शन व सुचवलेले उपाय ह्यांच्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव येतो. त्यांना असे वाटते की, ग्राहकांकडून मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद हीच माझी सर्वात मोठी कार्यसिद्धी होय.

पार्श्वभूमी

त्यांचा जन्म एका पारंपारिक व धार्मिक वृत्तीच्या नागर ब्राह्मण कुटुंबात झाला. त्या कुटुंबाची आध्यात्मिक ओढ सुपरिचित आहे. आपल्या वडिलांकडून आणि आजोबांकडून त्यांनी ज्योतिष शास्त्राचा वारसा घेतला आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र त्यांच्या रक्तातच आहे. अगदी लहान असल्यापासूनच त्यांची आध्यात्मिक प्रवृत्ती असून त्यांना ज्योतिषशास्त्राची व विविध धार्मिक कार्यक्रमांची आवड आहे. महाविद्यालयात त्यांनी कॉमर्सचे शिक्षण घेतले असले तरी वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी घरी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरु केला होता. स्वतःच्या वडिलांना ज्योतिषशास्त्रविषयक कामात मदत करायला सुरुवात करण्याअगोदर त्यांनी चार वर्षे कॉमर्सशी संबंधित ‘ग्राहक सेवा प्रतिनिधी’ ह्या पदावर काम केले.

अनुभव

१० वर्षे

विशेष प्राविण्य

ज्योतिषशास्त्रीय पद्धती, पूर्वानुमानित आणि सूचक भविष्यकथन, आध्यात्मिक ज्योतिष, लाल किताब, मानस ज्योतिष, सामाजिक प्रश्न, वैवाहिक प्रश्न, मालमत्ता, आरोग्य, आर्थिक स्थिती, कारकीर्द, शिक्षण आणि ज्योतिषशास्त्रीय उपाय

छंद

वैदिक पुस्तके वाचणे, अध्यात्म, ध्यानधारणा, संगीत, तीर्थयात्रा आणि नवी कौशल्ये आत्मसात करणे ह्यात त्यांना पहिल्यापासूनच रस होता. त्यांना श्री विद्या उपासक म्हणणेच योग्य होईल. हीलिंग पॉवर, कुंडलिनी ध्यान, चक्र हीलिंग आणि स्वतःला जाणणे किंवा आत्मज्ञान करून घेणे ह्या गोष्टींमधेही त्यांना रस आहे.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

ज्योतिषशास्त्राशी संबंधित असा हा व्यवसाय निवडण्याचे कारण – त्यांच्या खूप लवकर लक्षात आले की आपल्या अंतःप्रेरणा खूप शक्तिशाली असून ज्योतिषशास्त्र व ज्योतिषशास्त्रीय उपाय ह्या विषयात आपल्याला चांगली गती आहे. लोकांना त्यांची नियती बदलण्यास, त्यांचे प्रश्न सोडवण्यास तसेच स्वतःचे आयुष्य हवे तसे घडवण्यास मदत करणारे अतिशय सोपे, कमी खर्चात होणारे आणि परिणामकारक उपाय ते सुचवतात. मंत्राचा जप करणे, यंत्राची पूजा करणे किंवा रत्न अंगावर धारण करणे अशा स्वरूपाचे ते उपाय असतात.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.