आचार्य रोहिणी

क्षमता

रीटा जानी ह्यांचे ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र ह्यांच्यावर प्रभुत्व आहे. ‘ आधी मी तुमची मैत्रीण आहे आणि नंतर ज्योतिषी आहे ‘ हा त्यांच्या मनातला दृष्टिकोन बऱ्याचशा ग्राहकांना पटतो आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी चांगले सूर जुळतात. त्या स्वतःच्या ग्राहकांचा उल्लेख नेहमी ‘माझे मित्र’ असाच करतात.

कार्यसिद्धी

त्यांना असलेले भूतकाळाचे अफाट ज्ञान आणि ज्योतिषशास्त्रासह इतरही अनेक विषयांचे ज्ञान यांच्या जोडीला त्यांच्याकडे सहजपणे संवाद साधण्याची हातोटी आहे. कामासंदर्भात येणारे मुद्दे त्या अतिशय साध्या भाषेत आणि परिणामकारक पद्धतीने समजावून देऊ शकतात. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बोलण्यात अत्यंत प्रेमळपणा आणि कमालीची आपुलकी असते. त्यांच्याशी बोलणारी व्यक्ती किशोरवयीन असो, तीस वर्षे वयाची नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा सत्तर वर्षे वयाची वृद्ध व्यक्ती असो, कोणाचेही बोलणे ऐकून त्या व्यक्तीला काय डाचत आहे, ते रीटा जानी यांना लगेच कळते. त्यांच्याकडे असलेल्या ह्या असामान्य कौशल्यामुळे त्यांच्या ग्राहकांपैकी अनेकांकडून त्यांची प्रशंसा झालेली आहे.

पार्श्वभूमी

त्यांचे वडील डॉक्टर असले तरी त्यांना लहानपणापासूनच ज्योतिषशास्त्रात रस वाटू लागला होता. एखाद्या व्यक्तीच्या भविष्यात काय घडणार आहे, हे आपल्याला समजू शकते या गोष्टीचे त्यांना स्वतःला फारच आश्चर्य आणि कौतुक वाटत असे. ह्या शास्त्राच्या साहाय्याने इतरांच्या आयुष्याचे कल्याण होऊ शकते, ह्या विचारामुळे त्यांना अधिक प्रेरणा मिळते. त्यांचे आजोबा एक तज्ज्ञ ज्योतिषी होते आणि त्यांच्याकडेच रीटा यांनी ह्या शास्त्रातले धडे गिरवले. मुंबई विद्यापीठातून गुजराती साहित्य ह्या विषयात एम.ए. ही पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पतंजली विद्यापीठ (हरिद्वार) येथून योग शिक्षक होण्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर त्यांनी ध्यान कसे करावे ह्याचेही शिक्षण घेतले. त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल की, त्या अध्यात्माच्या एक अभ्यासक असून मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत.

अनुभव

१० वर्षे

विशेष प्राविण्य

प्रेम आणि प्रेमसंबंध, विवाह, कारकीर्द, आर्थिक स्थिती आणि मालमत्तेशी संबंधित प्रश्न

छंद

विविध विषयांवरील पुस्तके आणि मासिके वाचणे, गाणी ऐकणे आणि गाणे हे त्यांचे छंद आहेत. त्यांना शास्त्रीय संगीतात विशेष रुची असून त्यांनी स्वतःच्या मधाळ आवाजात गुणगुणलेले एखादे गाणे ऐकणे हा फारच आनंददायक अनुभव असतो. त्यांचा नवनिर्मितीकडेही कल असून त्यांना विविध कलांमध्ये रस आहे.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

त्या म्हणतात की, ज्योतिषशास्त्र हा त्यांचा जणू प्राण असावा इतकी त्या विषयाची त्यांना आवड आहे, म्हणून इतर बऱ्याच गोष्टींमधेही त्यांना रस असूनही ग्रह आणि ताऱ्यांचे हे शास्त्र त्यांनी स्वतःचा व्यवसाय म्हणून निवडले. लोकांशी सूर जुळण्याचे ज्योतिष हे माध्यम आहे आणि त्याद्वारे एक समाधानी समाज निर्माण करणे शक्य आहे असे त्यांना वाटते. त्यांना अगदी मनापासून असेही वाटते की, ज्योतिषशास्त्र हे योग, ध्यान आणि आपल्या आयुष्याच्या इतर अनेक अंगांशी जोडलेले शास्त्र आहे. स्वतःकडे येणाऱ्या ग्राहकांना योग्य ते ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याची त्यांना मनापासून इच्छा आहे. त्यामुळे आता ज्योतिषशास्त्र हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.