आचार्य धर्माधिकारी

क्षमता

सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक विशेष तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र यशस्वी तर झाले आहेच आणि त्याच्या वापराने प्रश्नाचा समूळ नाश होतो. एका सामर्थ्यवान आणि ज्ञानाचे आगर असलेल्या कुटुंबात जन्माला घातल्याबद्दल ते परमेश्वराचे आभारच मानतात. तसेच त्यांच्या आईवडिलांनी आणि सहकाऱ्यांनी धर्मेशजींची प्रत्येक नवी कल्पना उचलून धरली. एवढेच नव्हे तर, त्यांनी जी कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला, ती प्रत्येक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना मदत केली. धर्मेशजी प्रत्येक वेळी मोठ्या आत्मविश्वासाने लोकांचे प्रश्न हाती घेतात आणि ज्योतिषशास्त्राप्रती असलेल्या दुर्दम्य निष्ठेने काम करून त्यांचे प्रश्न सोडवतात.

कार्यसिद्धी

बेस्ट अँड सिन्सिअर एचओडी ऑफ एम्प्लॉईज हा पुरस्कार त्यांना २००५ ह्या वर्षी मिळाला. त्यांनी स्टॉक मार्केटबद्दल त्यांनी केलेल्या अंदाजांचे नेहमीच कौतुक होते. मनीकंट्रोल. कॉम, रेडिफ.कॉम, दलालस्ट्रीट.कॉम, मायआयरिस.कॉम, आउटलुकप्रॉफिट (मासिक), बियॉंड_मार्केट_निर्मलबंग (मासिक), मनीमंत्र (मासिक), स्मार्टइन्व्हेस्टमेंट (मासिक), द इकॉनॉमिक टाईम्स, संदेश वर्तमानपत्र, डीएनए मनी, फिलिंग्ज मासिक, फुलझप, अकिला वर्तमानपत्र, अहमदाबाद टाईम्स, दिव्यभास्कर वर्तमानपत्र, रखेवाळ वर्तमानपत्र, मुव्ही मासिक (युएसए आवृत्ती), झी टीव्ही गुजराती, ईटीव्ही गुजराती इत्यादी ठिकाणी त्यांचे लेख, मुलाखती प्रसिद्ध होत असतात.

पार्श्वभूमी

त्यांच्या कुटुंबात गेल्या आठ पिढ्यांपासून ज्योतिष, भविष्यकथन, अडचणींवर उपाय सुचवणे ह्या गोष्टी केल्या जातात. ज्योतिषशास्त्रात त्यांनी घेतलेल्या शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी त्यांचे वडील गिरीशभाई जोशी यांच्याकडून ज्योतिषशास्त्र आणि अडचणी निवारणासाठी उपाय / तोडगे ह्यांचे शिक्षण घेतले आहे. स्वतः गिरीशभाई जोशी हे अहमदाबाद व गुजरातमध्ये अडचणी निवारणासाठी उपाय / तोडगे सांगण्यासाठी सुप्रसिद्ध असून विशेष तज्ज्ञ समजले जातात. ह्या कामासाठी लोक त्यांना परदेशातूनही फोन करतात किंवा प्रत्यक्ष येऊन भेटतात. श्री. आचार्य धर्माधिकारीएकत्र कुटुंबात राहतात.

अनुभव

१५ वर्षेे

विशेष प्राविण्य

स्टॉक मार्केट, कमोडिटी, उपाय

छंद

त्यांना क्रिकेट पाहायला आणि खेळायला आवडते. वैदिक साहित्यात त्यांना विशेष रुची असून त्याचे त्यांनी बरेच वाचन केले आहे. त्यांच्या मते वाचनाने आपल्या मेंदूला योग्य ते पोषण मिळते. तसेच वाचनाने आपला उत्साह वाढतो आणि मनोरंजनही होते. योगाभ्यासाने आपल्या तनामनातील उर्जेचा समतोल साधला जातो आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखले जाते असे त्यांना वाटते. त्यामुळे ते एकही दिवस योगाभ्यास चुकवत नाहीत. त्यांच्या दैनिक कार्यक्रमात नित्याचे स्थान असलेली पूजा ही आणखी एक गोष्ट आहे. लहानपणी ते जेव्हा मंत्रपठण शिकले तेव्हापासून ते नियमितपणे पूजा करतात. पूजेमुळे त्यांच्या आत्मिक व्यक्तिमत्वाला सामर्थ्य मिळते. ह्या सगळ्या कारणांमुळे ते रोजची पूजा कधीही चुकवत नाहीत.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

त्यांच्या मनात असा दृढ विश्वास आहे की, जर परमेश्वराने प्रश्न निर्माण केला असला, तर त्याला उत्तर असलेच पाहिजे. एखादे झाड असो किंवा माणूस, त्याचे आरोग्य चांगले नसले तर त्याला काहीतरी कारण असले पाहिजे आणि त्यावर उपायही असलाच पाहिजे. अशा मूलभूत गोष्टींवर ते सतत विचार करत असतात. असे उपाय शोधायला आणि ते सांगून सगळ्यांना शक्य तितकी मदत करायला त्यांना आवडते. स्टॉक मार्केट आणि कमोडिटी मार्केटबद्दल अचूक अंदाज सांगून लोकांना मदत करत राहावे, ही त्यांच्या मनातील आणखी एक प्रबळ इच्छा आहे. कारण सरावाने त्यांना हे कळले आहे की, ह्या स्टॉक मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा अचूक अंदाज करता येतो.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.