भविष्य कथन २०२१ - आपल्या राशीनुसार २०२१ चे भविष्य कथन जाणून घ्या

भविष्य कथन २०२१

भविष्य समजल्या शिवाय भविष्यात प्रवेश करणे अशक्य होऊ शकते. त्यासाठीच आम्ही २०२१ च्या भविष्य कथनाच्या माध्यमातून प्रत्येक राशीचे मूल्यांकन सादर करीत आहोत. राशीनुसार २०२१ चे भविष्य कथन करताना आम्ही आर्थिक स्थिती, प्रणयी जीवन, वैवाहिक जीवन, कारकीर्द, नोकरी, व्यवसाय, शिक्षण व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रांचा विचार करूनच राशीफल दिले आहे. खाली संक्षिप्त राशीफल देत आहोत. हे आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. प्रत्येक राशीच्या खाली विस्तृत अहवालावर क्लिक करून आपण २०२१ चे भविष्य कथन उत्तम प्रकारे प्राप्त करून लाभांकीत होऊ शकता ..

मेष रास

मेष रास

मेष राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष अनेक अपेक्षा घेऊन येणारे आहे. आपल्या बहुतांश योजना फलद्रुप होतील, ज्यात हे वर्ष आपणास आर्थिक बाबतीत खूपच चांगले परिणाम देऊन आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत करेल. आपणास मात्र आपल्या अव्यावहारिक व अवांछित खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपले आर्थिक गणित कोलमडू शकते. मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२१ दरम्यान प्रेम व संबंधांची ची सुरवात उत्तमच होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी २०२१ ची सुरवात अत्यंत चांगली असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र २०२१ ची सुरवात काहीशी कमकुवत असण्याची शक्यता आहे …

(मेष राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

वृषभ रास

वृषभ रास २०२१

२०२१ चे वर्ष आपणास स्थैर्य मिळवून देण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देणारे आहे. जर ह्या संधींचा फायदा उचलू शकलात तर २०२१ दरम्यान आपण उत्तम प्रगती साधू शकाल. प्रणयी जीवनाच्या सुरवातीला २०२१ चे वर्ष उत्तम असून आपल्या प्रेमात खरेपणा वृद्धिंगत होईल. आर्थिक बाबतीत सुद्धा हे वर्ष सामान्याहून अधिक चांगले फलदायी आहे. असे असले तरी सुरवातीचे काही महिने मध्यम फलदायी असल्याने त्या दरम्यान पैश्यांचा सदुपयोग करण्याचा विचार करावा लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाचे सुरवातीचे व अखेरचे काही महिने उत्तम असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी २०२१ ची सुरवात मध्यम फलदायी आहे. २०२१ चे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने मध्यम फलदायी आहे …

(वृषभ राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

मिथुन रास

मिथुन रास २०२१

मिथुन राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष मध्यम फलदायी असणार आहे. प्रणयी जीवनासाठी २०२१ चे वर्ष चांगले असले तरी वैवाहिक जीवनात जोडीदाराशी ताण – तणाव निर्माण करणारे आहे. २०२१ चे वर्ष आर्थिक दृष्ट्या मध्यम फलदायी आहे. मिथुन जातकांना २०२१ दरम्यान नोकरीत अनेक चढ – उतार अनुभवास येतील. विद्यार्थ्यांसाठी २०२१ ची सुरवात सामान्यच होईल. शिक्षणात काही अडथळे आले तरी शिक्षण चालूच राहील. २०२१ दरम्यान आरोग्य विषयक काही विशेष त्रास होताना दिसत नाही …

(मिथुन राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्क रास

कर्क रास २०२१

कर्क राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष अत्यंत चांगले असल्याचे दिसत आहे. २०२१ ची सुरवात आपल्या प्रणयी जीवनासाठी अत्यंत चांगली आहे. ह्या दरम्यान आपणास प्रेमालाप करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती वर्षाच्या सुरवाती पासूनच चांगली राहील, व एकाहून अनेक माध्यमातून आपणास धन प्राप्ती होईल. कर्क राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात अत्यंत चांगली असून त्यांना एखादे मोठे पद प्राप्त होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्याच बरोबर त्यांच्या कर्तव्यात व जवाबदारीत सुद्धा वाढ होईल. शैक्षणिक जीवनात गूढ विषयांकडे आपला कल अधिक होईल. कर्क राशीच्या जातकांसाठी २०२१ च्या सुरवातीचे काही महिने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असले तरी आपणास दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल …

(कर्क राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

सिंह रास

सिंह रास २०२१

सिंह राशीच्या जातकांचा आत्मविश्वास २०२१ च्या सुरवातीस वृद्धिंगत होणार असून आपण जर तो टिकवू शकलात तर ह्या वर्षात आपण बरेच काही साध्य करू शकाल. प्रेम व संबंधांसाठी सिंह राशीच्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात सामान्यच होणार असून ह्या दरम्यान आपणास आपल्या जीवनातील काही आवश्यक बाबींचा विचार करावा लागेल. वर्षाच्या सुरवातीच्या काही महिन्यात आपले खर्च वाढणार असल्याने आर्थिक दृष्ट्या २०२१ ची सुरवात मध्यम फलदायी असेल. सिंह राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष खूपच अनुकूल असून त्यांना आपल्या कष्टाचे योग्य फळ मिळवून देणारे आहे. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना २०२१ चे वर्ष अनुकूल फलदायी आहे. शिक्षणात आपली उत्तम प्रगती होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र हे वर्ष सामान्य फलदायी आहे …

(सिंह राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

कन्या रास

कन्या रास २०२१

कन्या राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष अतिशय फायदेकारक आहे. प्रेम संबंध व वैवाहिक जीवन ह्यासाठी २०२१ चे वर्ष अंशतः फलदायी ठरणारे आहे. आर्थिक दृष्ट्या २०२१ ची सुरवात सामान्यच झाली तरी सुरवातीच्या काही महिन्यात आपणास थोडी अवांछित धन प्राप्ती होण्याची शक्यता सुद्धा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाची सुरवात काहीशी संथ गतीने होईल व कदाचित सध्याची नोकरी बदलण्याच्या प्रयत्नांत यश प्राप्ती सुद्धा होईल. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना २०२१ चे वर्ष मिश्र फलदायी आहे. समाजास नवीन दिशा देऊ शकेल अशा विषयांची गोडी आपणास लागण्याची शक्यता अधिक आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून २०२१ चे वर्ष एकंदरीत चांगले आहे. वर्षाचे सुरवातीचे काही महिने थोडे …

(कन्या राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

तूळ रास

तूळ रास २०२१

तूळ राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष सामान्य फलदायी आहे. जीवनातील काही क्षेत्रात आपणास उत्तम फले मिळतील, मात्र काही क्षेत्रात आपणास अधिक लक्ष घालावे लागेल. प्रणयी जीवनाच्या दृष्टिकोनातून २०२१ चे वर्ष तूळ राशीच्या जातकांना सामान्य फलदायी ठरणारे आहे. आर्थिक बाबींवर आम्ही नजर फिरवत असताना आमच्या असे ध्यानात आले कि २०२१ चे वर्ष आपल्यासाठी सामान्याहून अधिक चांगले राहणारे आहे. तूळ राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष शुभ फलदायी आहे. २०२१ चे वर्ष शैक्षणिक दृष्ट्या विशेष परिणाम देणारे निश्चितच नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सामान्यच आहे. आपणास काही सामान्य …

(तूळ राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

वृश्चिक रास

वृश्चिक रास २०२१

वर्षाच्या सुरवातीस आपल्या मनात विचारांचे वादळ उठल्याने २०२१ ची सुरवात आपल्यासाठी मध्यम फलदायी ठरेल. २०२१ ची सुरवात वृश्चिक जातकांच्या प्रणयी जीवनासाठी उत्तम फलदायी आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने २०२१ ची सुरवात अत्यंत उत्कृष्ठ ठरणारी आहे. आपण जर नोकरी करत असाल तर आपली २०२१ ची सुरवात खूपच चांगली होईल. नोकरीत आपला चांगला सन्मान होईल व आपले काम प्रशंसित केले जाईल. २०२१ ची सुरवात विद्यार्थ्यांसाठी चांगली होऊन आपल्या कष्टाचे यथोचित फल आपणास प्राप्त होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपणास हे लक्षात घ्यावे लागेल कि …

(वृश्चिक राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

धनु रास

धनु रास २०२१

२०२१ चे वर्ष धनु राशीच्या जातकांसाठी अनुकूल असून नवीन वर्षाची सुरवात आपल्यासाठी अत्यंत आनंददायी वातावरणात होईल. प्रणयी जीवनासाठी हे वर्ष उत्तम असून नात्यातील प्रेम व आपलेपणा वृद्धिंगत होईल. आर्थिक दृष्ट्या २०२१ चे वर्ष चांगले असून निश्चितपणे प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चात सुद्धा वाढ होणार आहे. धनु राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात चांगलीच होणार आहे. आपल्या कष्टाचे यथोचित फल ह्या वर्षात आपणास मिळेल. विद्यार्थ्यांसाठी २०२१ ची सुरवात चांगली होणार असून त्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्षाची सुरवात काहीशी कमकुवतच असेल. आपल्या दिनचर्येतील अनियमितता व आहारातील असंतुलता आपले आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरेल. ह्या वर्षी आपणास डोळ्यांची ….

(धनु राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

मकर रास

मकर रास २०२१

मकर राशीच्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष अत्यंत चांगले जाणारे आहे. वर्षाच्या सुरवातीसच आपली प्रगतीपथावर जाण्याची इच्छा प्रबळ होईल. आपल्या प्रणयी जीवनासाठी हे वर्ष विशेष असेल. खर्चात अचानकपणे वाढ झाल्याने २०२१ ची सुरवात आर्थिक दृष्ट्या काहीशी दुर्बलच असेल. नोकरी करणाऱ्या जातकांना २०२१ च्या सुरवातीस एखादा फायदेशीर सौदा होऊन वरिष्ठां कडून वेळोवेळी लाभ मिळू शकेल. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२१ चे वर्ष अनुकूल असून वर्षाच्या सुरवाती पासून ते अखेर पर्यंत आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होत राहील. ह्या वर्षात आपले मनोबल उत्तम राहिले तरी २०२१ च्या सुरवातीस आरोग्य मात्र काहीसे प्रतिकूल राहील …

(मकर राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

कुंभ रास

कुंभ रास २०२१

कुंभ राशीच्या व्यक्ती अति विचार करणाऱ्या असतात व त्यामुळेच निर्णय घेण्यात ते बहुतांशी यशस्वी होतात. असे असले तरी कधी कधी त्यांना आपल्या निर्णयात बदल सुद्धा करावा लागतो. प्रणयी जीवनाच्या दृष्टिकोनातून २०२१ ची सुरवात खूपच चांगली होणार आहे. २०२१ ची सुरवात आर्थिक बाबतीत काहीशी प्रतिकूल असेल. कुंभ राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची सुरवात चांगली होईल. विद्यार्थ्यांसाठी २०२१ ची सुरवात सामान्याहून अधिक चांगली होईल. अभ्यासात आपली एकाग्रता होऊ शकेल. आरोग्याच्या बाबतीत आपली २०२१ ची सुरवात मध्यम फलदायी असेल …

(कुंभ राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)

मीन रास

मीन रास २०२१

मीन राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनाप्रधान असतात. हीच भावनाप्रधानता त्यांची शक्ती ठरते तर कधी दुर्बलता. प्रेमात पडताना कोणावरही एकदम विश्वास न ठेवण्याची खबरदारी घ्यावी, अन्यथा मागाहून पश्चाताप करावा लागेल. आपली प्राप्ती पदोपदी वाढत राहिल्याने आपणास कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येस सामोरे जावे लागणार नाही. आपले साहस व पराक्रम वाढीस लागल्याने आपण जोखीम घेण्या पासून मागे हटणार नाही. ह्याच संवयीमुळे आपण आपल्या व्यापारात प्रगती साधू शकाल. इतकेच नव्हे तर आपण आपल्या मित्रांना भरपूर सहकार्य करून त्यांच्या खांद्यास खांदा देऊन कार्य कराल व त्यामुळे आपला सामाजिक दर्जा सुद्धा वाढेल व आपल्या अनुनयांच्या संख्येत सुद्धा वाढ होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण आशास्पद राहील व कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी प्राप्त होईल …

(मीन राशीचा विस्तृत अहवाल मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.)


श्री गणेशजींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहो,
एस्ट्रो डॉट लोकमत डॉट कॉम